Hemant Godse : आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून सत्ताधारी महायुतीत वाद असल्याची माहिती समोर आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघातून (Nashik Lok Sabha Constituency) इच्छुक असणारे शिंदे गटातील हेमंत गोडसे (Hemant Godse) महायुतीला धक्का देत नाशिक मतदारसंघातून अपक्ष लढण्याची तयारी करत असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. तर नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा नाव महायुतीकडून जवळपास फिक्स झाला असल्याची देखील चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.
तर दुसरीकडे आज पुन्हा एकदा हेंमत गोडसे आणि शिवसेना पदाधिकारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेणार आहे. जर यानंतर देखील शिंदे गटासाठी नाशिकची जागा सुटली नाहीतर हेंमत गोडसे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे.
चीनची खोडी! अरुणाचल प्रदेशातील 30 ठिकाणांचे केले नामकरण
नाशिक मतदारसंघातून शिंदे गटातील हेंमत गोडसे यांची उमदेवार निश्चित मानली जात होती मात्र अचानक छगन भुजबळ यांचे नाव समोर आल्यानं शिंदे गटात अस्वस्थता पसरली. यामुळे आता छगन भुजबळ यांना महायुतीकडून उमदेवारी जाहीर झाल्यानंतर गोडसे आपली भूमिका जाहीर करणार आहे.
जर गोडसे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर नाशिक मतदारसंघात चौथ्यांदा हेंमत गोडसें विरुद्ध छगन भुजबळ यांच्यात लढत होईल. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांच्या तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत समीर भुजबळ यांचा हेंमत गोडसे यांनी पराभव केला होता.
काँग्रेसला दिलासा! ‘त्या’ प्रकरणात होणार नाही कारवाई, प्राप्तिकर विभागाकडून मोठा निर्णय
तर 2009 च्या लोकसभा निवडणुकीत समीर भुजबळ यांनी 22 हजारांच्या फरकाने हेंमत गोडसे यांचा पराभव केला होता.
हेमंत गोडसे पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटत नसल्याने आणि उमेदवारी मिळावी यासाठी हेमंत गोडसे आज पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे.
VVPAT स्लिपची होणार संपूर्ण मोजणी? सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस..
माहितीनुसार, आज रात्री उशिरा ही भेट होऊ शकते. या भेटीनंतर नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटणार की आणखी वाढणार याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.