अधिवेशनातील शेवटच्या भाषणामुळे मला खरात प्रकरणात ओढलं, गोऱ्हेंचं पुन्हा ठाकरेंकडं बोट

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर अशोक खरातची भेट घेतल्याचा आरोप केले होते.

News Photo   2026 03 30T190347.684

अधिवेशनातील शेवटच्या भाषणामुळे मला खरात प्रकरणात ओढलं, गोऱ्हेंचं पुन्हा ठाकरेंकडं बोट

आपल्यावर झालेल्या संस्कारामुळे हयात (Kharat) असलेल्या कोणत्याही बाबाच्या दर्शनासाठी आपण जात नाही, त्यामुळे अशोक खरातला कधीही भेटायचा संबंध नाही असं शिंदे गटाच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत. तसंच, गेल्या चार दशकापासून आपण सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत असून राजकीय पद किंवा मंत्रिपदासाठी कोणत्याही भोंदूबाबाला आपण भेटायला गेलो नाही असंही त्या म्हणाल्या. त्या आयोजीत पत्रकार परिषदेत बोलत होत्या. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर अशोक खरातची भेट घेतल्याचा आरोप केले होते. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एक महिला आमदार मंत्रिपदासाठी अशोक खरातच्या कार्यलयात जात होत्या. नीलम गोऱ्हे या गेली पाच ते सहा वर्षे खरातकडे जात होत्या असा आरोप भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केला होता. त्यावर नीलम गोऱ्हे यांनी त्यांची बाजू मांडली. अधिवेशनाच्या शेवटच्या भाषणात मी ज्यांच्यावर टीका केली ते दुखावले असतील, त्यामुळेच हे आरोप होत असल्याचं सांगत नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता त्यांच्याकडं बोट केलं.

खरात प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहारात CA पोफळेची भूमिका काय? तपासात होणार मोठे खुलासे

गेल्या चार दशकापासून आपण सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत असून राजकीय पद किंवा मंत्रिपदासाठी कोणत्याही भोंदूबाबाला आपण भेटायला गेलो नाही अशी प्रतिक्रिया नीलम गोऱ्हे यांनी दिली. आपल्यावर झालेल्या संस्कारामुळे हयात असलेल्या कोणत्याही बाबाच्या दर्शनासाठी आपण जात नाही, त्यामुळे अशोक खरातला कधीही भेटायचा संबंध नाही असं गोऱ्हे म्हणाल्या. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर अशोक खरातची भेट घेतल्याचा आरोप केले होते. त्यावर गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली.

एक महिला आमदार मंत्रिपदासाठी अशोक खरातच्या कार्यलयात जात होत्या. नीलम गोऱ्हे या गेली पाच ते सहा वर्षे खरातकडे जात होत्या असा आरोप भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केला होता. त्यावर नीलम गोऱ्हे यांनी त्यांची बाजू मांडली. अधिवेशनाच्या शेवटच्या भाषणात मी ज्यांच्यावर टीका केली ते दुखावले असतील, त्यामुळेच हे आरोप होत असल्याचं सांगत नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला.

Exit mobile version