Download App

उत्तरेकडील थंड वाऱ्यांनी महाराष्ट्र गारठला, पुढील दोन दिवस ‘या’; ठिकाणी पावसाची शक्यता, IMD चा इशारा

  • Written By: Last Updated:

IMD Weather Update : गेल्या काही दिवसांपासून डोंगराळ भागात बर्फवृष्टी (snowfall) झाल्यानं मैदानी भागात थंडी वाढली आहे. काश्मीरच्या मैदानी भागातील बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात थंडीची लाट सुरू आहे. तर झारखंडमध्ये धुक्याची चादर पसरली आहे. दुसरीकडे तामिळनाडूमध्ये अवकाळी पावसाने पुन्हा एकदा दाणादाण उडवली आहे.

नगर कल्याण महामार्गावर झालेल्या अपघातात 8 जण जागीच ठार, मृतांमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश 

पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्लीच्या अनेक भागांमध्ये किमान तापमान 4 ते 8 अंशांच्या दरम्यान आहे. पंजाबमधील अमृतसर आणि लुधियाना येथे देशातील सर्वात कमी तापमान 4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. तर तामिळनाडूमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत असून अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. IMD नुसार, जम्मू आणि काश्मीरच्या उत्तर सीमेवर वेस्टर्न डिस्टर्बन्सची स्थिती अजूनही कायम आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत दक्षिण तामिळनाडू, दक्षिण केरळ आणि लक्षद्वीपमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजरांचे पाय आणखी खोलात; एसआयटीच्या चौकशी आधीच एसीबीची धडक ! 

तामिळनाडू आणि कर्नाटक किनारपट्टीच्या उर्वरित भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि अंदमान आणि निकोबार बेटांच्या दक्षिण किनारपट्टी भागातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तापमानात होणार घसरण
उत्तर भारतीय थंडीचे लोण हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात पसरत आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये 11 अंश तापमानाची नोंद झाली. पुणे, नाशिक, अहमदनगरमध्ये पारा 12 अंशांवर होता. शनिवारी नाशिकमध्ये 12, अहमदनगरमध्ये 12, संभाजीनगरमध्ये 13.4, परभणीमध्ये 13, महाबळेश्वरमध्ये 13, पुण्यात 14, बीडमध्ये 14, जालन्यात 14, नांदेडमध्ये 14, जळगावमध्ये 14, अकोल्यात 14 अंश तापमानाची नोंद झाली. पुढील तीन दिवस किमान तापमानात आणखी घसरण होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

राज्यात या भागात पावसाची शक्यता
दक्षिणेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे. काही ठिकाणी थंडी तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. येत्या दोन दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. 21 डिसेंबरनंतर बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील हवामान कोरडे व थंड आहे. अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांचा वेग कमी झाा तरी नैऋत्य बंगालच्या खाडीत विषुववृत्ताजवळ वारे वाहत आहेत. त्यामुळं कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे.

Tags

follow us