नगर कल्याण महामार्गावर झालेल्या अपघातात 8 जण जागीच ठार, मृतांमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश

  • Written By: Published:
नगर कल्याण महामार्गावर झालेल्या अपघातात 8 जण जागीच ठार, मृतांमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश

Nagar-Kalyan Highway Accident: अपघातांवर नियंत्रण मिळण्यासाठी पोलिस विभाग आणि संबंधित यंत्रणांकडून विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. मात्र, अपघातांना आळा घालण्यात हवं तसं यश मिळालेलं नाही. अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. रविवारी पुणे-नाशिक महामार्गावर अपघात होऊन कारमधून प्रवास करणाऱ्या चौघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक अपघात झाल्याचे वृत्त समोर आले. पुणे जिल्ह्यातील नगर कल्याण महामार्गावरही (Nagar-Kalyan Highway) भीषण अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. यात दोन लहान मुलांचाही समावेस आहे.

दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग? परिस्थिती गंभीर, रुग्णालयात उपचार सुरू, सोशल मीडियावर चर्चांना उधाण 

मिळालेल्या माहितीनुसार, नगर कल्याण महामार्गावर रविवारी रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. डिंगोरे परिसरातील अंजिराची बाग येथे झालेल्या तिहेरी भीषण अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात ओतूरहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या पिकअपने रिक्षा आणि ट्रकला जोरदार धडक दिली. यात आठ जण जागीच ठार झालेत. मृतांमध्ये पती-पत्नी आणि दोन लहान मुलांचा समावेश असून ते मढ येथे भाजीपाला व्यवसाय करत होते.

ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजरांचे पाय आणखी खोलात; एसआयटीच्या चौकशी आधीच एसीबीची धडक ! 

या अपघातात एकूण मृतांची संख्या आठ आहे. यामध्ये पाच पुरुष, एक महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे. गणेश मस्करे (वय 30 वर्षे), कोमल मस्करे (वय 25 वर्षे), हर्षद मस्करे (वय 4 वर्षे), काव्या मस्करे (वय 6 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. अन्य मृतांची नावे अद्याप समोर आलेली नाही.

दरम्यान, डिंगोरे येथील अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे व त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. स्थानिक लोकांसह पोलिसांनी मदतकार्य करून अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ओतूर येथे आणण्यात आले आहेत.

हा अपघात इतका भीषण होता की, पिकअपचा अक्षरश: चक्काचूर झाला. दरम्यान, या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube