दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग? परिस्थिती गंभीर, रुग्णालयात उपचार सुरू, चर्चांना उधाण

  • Written By: Published:
दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग? परिस्थिती गंभीर, रुग्णालयात उपचार सुरू, चर्चांना उधाण

Dawood Ibrahim Hospitalized : मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दाऊद इब्राहिमची प्रकृती खालावल्याने त्यााला पाकिस्तानातील कराची येथील रुग्णालयात (Karachi Hospital) दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्याला विषबाधा झाल्याचं सांगण्यात येत आहे. दाऊदवर अज्ञाताकडून विषप्रयोग झाल्याचे जरी सांगितले जात असले तरी, याबाबत अद्याप भारत किंवा पाकिस्तानने या वृत्ताची पुष्टी केलेली नाही. मात्र, दाऊदला कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत कराचीतील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.

‘शरद पवारांमुळेच आरक्षण नाही”हेडलाईनसाठी पवारच लागतात’; सुळेंचं फडणवीसांना सडेतोड उत्तर 

भारतातील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांपैकी एक दाऊद इब्राहिमचा संघटित गुन्हेगारी, दहशतवाद आणि अंमली पदार्थांची तस्करी यासह विविध गुन्हेगारी कारवायांशी संबंध आहे. 1993 मध्ये मुंबई झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामागे दाऊचा हात होता. या स्फोटात 300 हून अधिक नागरिकांना जीव गमवावा लागला होता. तर, हजारो लोक जखमी झाले होते.

नाशिक-पुणे महामार्गावर भीषण अपघात; ट्रक कारला धडकल्याने चौघांचा जागीच मृत्यू 

इंटरनेट सेवा बंद

दुसरीकडे, दाऊदवर विषप्रयोग केल्याच्या वृत्तानंतर खळबळ माजलेली असतानाच पाकिस्तानातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे दाऊदच्या प्रकृतीबाबत चर्चांना उधाण आले असून, अनेक यूजर्सकडून दाऊदवर अज्ञाताकडून विषप्रयोग केल्याचा दावा केला जात आहे. काही दिवसांपूर्वी द फ्री प्रेस जर्नलने एक अहवाल प्रकाशित केला होता. ज्यात दाऊद अनेक आरोग्याच्या गंभीर आव्हानांचा सामना करत असून, गँगरीनमुळे त्याच्या पायाची दोन बोटे कापण्यात आल्याचे म्हटले होते. मात्र, दाऊदच्या जवळचा सहकारी छोटा शकीलने हे वृत्त फेटाळून लावले होते.

दरम्यान, आता दाऊद इब्राहिमवर विषबाधा झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, दाऊदच्या प्रकृतीबाबबत भारतीय सुरक्षा यंत्रणा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेत तथ्य नसल्याचे दिसून येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube