Download App

अजितदादांनी ठणकावल्यानंतर आयजी सुपेकर आले समोर; सर्व आरोप फेटाळत दिला इशारा

IG Supekar यांनी प्रेसनोट काढून सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच त्यांनी यावेळी संबंधिताविरुद्ध दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

In Vaishnavi Hagavane case, IG Supekars disclosure after Ajit Pawar Warn : वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केली. सासरच्या छळाला कंटाळून तीने आपलं आयुष्य संपवल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकरांवर आरोप केले आहेत. वैष्णवीचं बाळ आणण्यासाठी गेलेल्या कस्पटे कुटुंबातील व्यक्तींना ज्याने बंदुक दाखवून धमकावलं त्या निलेश चव्हाण याला जालिंदर सुपेकर यांनीच बंदुकीचा परवाना दिल्याचं दमानिया यांनी म्हटलं आहे. तसेच ते हगवणे कुटुंबाचे नातेवाईक असल्याने त्यांचा देखील या प्रकरणात दबाब होता. त्यावरून स्वत: अजित पवारांनी देखील त्यांना ठणकावले आहे. त्यामुळे माध्यमांमध्ये सुपेकरांचे नाव चर्चेत आहे. त्यानंतर मात्र आता राज्याचे कारागृह विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी प्रेसनोट काढून सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच त्यांनी यावेळी संबंधिताविरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा देखील दिला आहे.

काय म्हणाले आयजी जालिंदर सुपेकर?

या प्रेसनोटमध्ये म्हटले गेले आहे की, नमस्कार, सर्व इलेक्ट्रॉनिक, वेबपोर्टल, प्रिंट मीडियासह इतर माध्यमकर्मीसाठी मी डॉ. जालिंदर सुपेकर विशेष पोलीस महानिरीक्षक, कारागृह सेवा सुधार विभाग महाराष्ट्र खालीलप्रमाणे जाहीर खुलासा करीत आहे.

जगभरात ‘X’ची सेवा बंद; लोकांकडून तक्रारींचा पाऊस, कंपनीची सर्व्हर दुरुस्त करण्यासाठी पळापळ

पोलीस निरीक्षक आत्महत्या,प्रकरणात आमचा दोष नसल्याचे न्यायालयात सिद्ध -पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्या प्रकरणीचा तपास सीआयडी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) यांच्याकडून करण्यात आलेला आहे. त्यामध्ये अशोक सादरे यांनी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये नमूद केलेला कोणताही प्रकार हा घडलेला नसल्याबाबत त्यांनी न्यायालयाला अहवाल सादर केला होता. सदर अहवालातील गोष्टींची न्यायालयाने ही पडताळणी करून तो अहवाल बरोबर असल्याबाबत खात्री करून स्वीकारला आहे . त्याबाबत आमचा कोणताही दोष नसल्याचे न्यायालयात सिद्ध झाले आहे.

राज्यात बहुचर्चित हगवणे प्रकरणात चर्चेत आलेला ‘हुंडा’ हा शब्द कुठून आला? त्याचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या…

कारागृह वस्तू खरेदीत ५०० कोटींचा भ्रष्टाचार आरोप बाबत -तुरुंग विभागात खरेदीमध्ये ५०० कोटी रुपयांचा जो भ्रष्टाचार झाला असा आरोप होत आहे, सदर खरेदी हीच मुळात 350 कोटी रुपयांची आहे. त्यामध्ये 500 कोटी रुपयांचा गैरव्यवहार होऊ शकत नाही. तसेच सदर खरेदी ही शासनाने नेमलेल्या राज्य खरेदी समितीमार्फत होत असते . सदर समितीचा मी फक्त एक सदस्य आहे. कमिटीचे इतर सदस्य हे तुरुंग विभागाचे वरिष्ठ अधिकारी , गृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी व इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी असतात. हे अधिकारी आमच्याही पेक्षाही वरिष्ठ स्तरावरील असतात. सर्व निर्णय हे पूर्ण कमिटी घेत असते. मला एकट्याला त्यामध्ये स्वतंत्र अधिकार नाही. त्यामुळे त्याबाबत माझ्यावर लावलेले पूर्ण आरोप हे पूर्णतः खोटे आहेत. सदर कमिटीमार्फत सदरची खरेदी शासकीय नियमाप्रमाणे झालेली आहे व तसा अहवाल शासनाला पाठवण्यात आलेला आहे.

बांग्लादेशात युनूस यांची खुर्ची पक्की, इमर्जन्सी बैठकीत शिक्कामोर्तब; अंतरिम सरकार तुर्तास स्थिर..

हगवणे कुटुंबाच्या कृत्याचा निषेधच – मागील २ वर्षापासून माझी नेमणूक प्रतिनियुक्तीवर तुरुंग विभागात पोलीस महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा या पदावर आहे.त्यामुळे माझा कार्यकारी पोलीस दलाशी कोणताही संबंध नाही. कार्यकारी पोलीस दलातील कोणताही घटक हा माझ्या अधिपत्याखाली नाही. त्यामुळे मी कोणाला सूचना देण्याचा संबंध येत नाही . हगवणे कुटुंबाबाबत मी कोणालाही कसलीही सूचना दिलेली नाही. हगवणे कुटुंबाने केलेल्या अमानवीय अपराधाशी माझा कुठलाही संबंध नाही. त्यांनी केलेल्या कृत्याचा मी या अगोदरही निषेधच केलेला आहे. कृपया त्यांच्या कृत्याशी माझा संबंध जोडू नये ही माझी नम्र विनंती.

ब्रेकिंग : राज्यभरात EV वाहनांना टोलमाफी, फडणवीस सरकारच्या धडाकेबाज निर्णयाचे आदेश निघाले

शस्त्र परवाना देण्याच्या अधिकाराबाबत – शस्त्र परवाना देण्याचे अधिकार संबंधित पोलीस आयुक्तांना असतात. तत्पुर्वी सदर अर्जदाराच्या अर्जावर स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनुकूल अथवा प्रतिकूल अहवाल संबंधित पोलीस उपयुक्तांना देतात. त्यांनी पडताळणी केल्यावर सदरचा परवाना पोलीस आयुक्त यांच्याच अंतिम मान्यतेने दिला जातो. त्यानंतर त्याचे आदेश हे अप्पर पोलीस आयुक्त प्रशासन हे काढत असतात.
त्यामुळे संबंधित शस्त्र परवाना देण्याच्या अंतिम निर्णय प्रक्रियेमध्ये माझा कुठलाही सहभाग नसतो. त्यामुळे सदरचा परवाना मीच दिला आहे हे म्हणणे चुकीचे आहे.

अजित पवारांचा आयपीएस जालिंदर सुपेकरांना फोन; हगवणे प्रकरणावरून दिला ‘हा’ थेट इशारा

व्हायरल ऑडिओ क्लिपबाबत- माझे कोणात्यातरी अज्ञात व्यक्तीबरोबर संभाषण असलेली ऑडिओ क्लिप काही माध्यमातून प्रसारित केली जात आहे. याबाबत माझे म्हणणे आहे की, संबंधित ऑडिओ क्लिपही बनावट असून, आमची बदनामी करण्याच्या दृष्टीने हेतुपूर्वक प्रसारित केली जात आहे. त्यामुळे अशा छेडछाड केलेल्या ऑडिओ क्लिपद्वारे माझी बदनामी करणाऱ्या संबंधिताविरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे.

काय म्हणाले अजित पवार?

दरम्यान, वैष्णवीच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याच पार्श्वभूमीवर प्रश्न विचारण्यात आला असता, त्यांनी सांगितले की, “या प्रकरणात जालिंदर सुपेकर यांचं नाव माझ्यापर्यंत देखील पोहोचलं आहे. मी त्यांच्याशी वैयक्तिकरित्या बोललो आहे आणि त्यांना याबद्दल सावध केलं आहे. जर त्यांच्या विरोधात कोणतेही पुरावे सापडले, तर सरकार कोणतीही हयगय न करता कारवाई करेल.

follow us