Download App

बिहारनंतर महाराष्ट्रातही India Alliance ची शकले होणार! भाजपच्या बड्या नेत्याचा दावा

India Alliance break in Maharashtra : बिहारनंतर महाराष्ट्रातही इंडिया आघाडीची (India Alliance) शकले होणार असा दावा भाजपच्या एका बड्या नेत्याने केला आहे. त्यामुळे आता नेमका कोणता पक्ष महाराष्ट्रात (Maharashtra) इंडिया आघाडीची साथ सोडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान भाजपचे खासदार राधा मोहन दास अग्रवाल यांनी हा दावा केला आहे.

विश्वविजेता होण्याचंं स्वप्न भंगलं! नेदरलँड्ने जिंकला पहिला हॉकी वर्ल्डकप; भारताचा पराभव

राधा मोहन दास अग्रवाल म्हणाले की, महाराष्ट्रमध्ये देखील इंडिया आघाडी तुटणार आहे. कारण काँग्रेसने असं वातावरण तयार केलं होतं की, काँग्रेस हा एकमेव पक्ष आणि राहुल गांधी हे एकमेव नेते आहेत. जे भाजप आणि पंतप्रधान मोदींच्या विरोधात आहे. त्यामुळे ही आघाडी एक ना एक दिवस तुटणारच होती.

World Richest Person : एलन मस्क पिछाडीवर, जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत ‘या’ व्यक्तीने मारली बाजी

पंजाबमध्ये आपचे मुख्यमंत्री भगवान सिंग मान यांनी देखील एकला चलो चा नारा दिलेला आहे. हरियाणामध्ये देखील तीच परिस्थिती आहे. देशात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातील भाजपच्या समोर कोणीही नाही. तसेच इंडिया आघाडीमध्ये जे काही दोन-चार पक्ष राहिले आहेत. त्यांना देखील हे कळून चुकलं आहे की, भाजपच्या व्यापक लाटेमध्ये ते भाजपसोबत गेले नाही. तर त्यांचा अस्तित्व संपून जाईल. त्यामुळे उरली-सूरलेली इंडिया आघाडी देखील तुटणार आहे. असा दावा अग्रवाल यांनी केला आहे.

Davis Cup साठी तब्बल 60 वर्षांनी टीम इंडिया पाकिस्तानात; केंद्र सरकारने दिली परवानगी

दरम्यान बिहारमध्ये नुकतेच मागील तीन दिवसांपासून चर्चेत असलेल्या नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी अखेर बिहारच्या (Bihar) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. आज (28 जानेवारी) संयुक्त जनता दलाच्या (JDU) विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांनी राजीनामा देत असल्याची घोषणा केली. तसेच यावेळी आपण भाजपसोबत (BJP) का जात आहोत, याबाबतची भूमिका आमदारांना समजावून सांगितली.

Iran-Pakistan मध्ये तणाव आणखी वाढला; इराणमध्ये 9 पाकिस्तानींवर झाडल्या गोळ्या

पंजाब राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी पंजाबमध्ये लोकसभेच्या सर्व जागा (Lok Sabha Election) लढणार असल्याचा दावा केला आहे. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. तरी देखील या घडामोडींमुळे आघाडीत फूट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री मान यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, पंजाबमध्ये आम्ही काँग्रेसबरोबर युती करणार नाही. राज्यातील 13 जागांवर आम्हाला यश मिळेल. त्यांच्या या वक्तव्यानंतर आगामी काळात आम आदमी पार्टीची वाटचाल कशी असेल याचे संकेत मिळत आहेत.

अखेर नितीश कुमार यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा; भाजपच्या पाठिंब्यावर पुन्हा होणार शपथविधी

त्या अगोदर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर (Lok Sabha Election) लढण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर ममता बॅनर्जी इंडिया आघाडीतून बाहेर पडणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. जागावाटपाच्या चर्चा निष्फळ ठरल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी ही घोषणा करून इंडिया आघाडीला मोठा धक्का दिला आहे.

त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर इंडिया आघाडीला मात्र धक्के बसू लागले आहेत. पश्चिम बंगाल, पंजाब, बिहारनंतर बिहारनंतर महाराष्ट्रातही इंडिया आघाडीची (India Allince) शकले होणार असा दावा भाजपच्या एका बड्या नेत्याने केला आहे. त्यामुळे आता नेमका कोणता पक्ष महाराष्ट्रात इंडिया आघाडीची साथ सोडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

follow us

वेब स्टोरीज