World Richest Person : एलन मस्क पिछाडीवर, जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत ‘या’ व्यक्तीने मारली बाजी
World Richest Person : टेस्ला आणि ट्विटर एक्सचे मालक एलन मस्क ( Elon Musk) हे आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती (World Richest Person) राहिलेले नाहीत. कारण टेस्लाच्या शेअर्समध्ये घसरण झाली. त्यामुळे मस्क यांची संपत्ती कमी झाली. तर आता मस्क यांच्या जागेवर फ्रान्सचे उद्योजक आणि लक्झरी ब्रँडचे मालक बर्नार्ड अरनॉल्ट हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
Davis Cup साठी तब्बल 60 वर्षांनी टीम इंडिया पाकिस्तानात; केंद्र सरकारने दिली परवानगी
फोर्ब्स रियल टाईम बिलेनियर्सने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार बर्नार्ड अरनॉल्ट यांची संपत्ती 207.6 बिलियन डॉलरच्या आसपास आहे. तर एलन मस्क त्यांची एकूण संपत्ती 204.7 बिलियन डॉलर आहे. त्यामुळेच त्यांना पिछाडीवर टाकत जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत पहिले स्थान मिळवलं आहे.
Iran-Pakistan मध्ये तणाव आणखी वाढला; इराणमध्ये 9 पाकिस्तानींवर झाडल्या गोळ्या
तर फोर्ब्स रियल टाईम बिलेनिअर्सच्या जगातील पहिल्या दहा श्रीमंतांच्या यादीनुसार आता बर्नार्ड अरनॉल्ट हे पहिल्या क्रमांकावर तर एलन मस्क आता दुसऱ्या क्रमांकावर गेले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस हे आहेत. चौथ्या स्थानावर लॅरी एलिसन, पाचव्या स्थानावर मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग त्यानंतर वॉरेन बफे, लॅरी पेज, बिल गेट्स, सर्गी ब्रिन आणि स्टीव्ह वॉलमर यांची नावे येतात.
भारताबद्दल सांगायचं झालं तर अशिया आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचे नाव या फोर्ब्स रियल टाईम बिलेनिअर्सच्या यादीत 11 व्या स्थानावर जाणार आहे. त्यांची संपत्ती 104.4 बिलियन डॉलर आहे. तर भारतातीलच दुसरे उद्योगपती गौतम अदानी हे या यादीमध्ये सोळाव्या स्थानावर आहेत. त्यांची संपत्ती 75.7 बिलियन डॉलर आहे.