Download App

Jalna Maratha Protest : पोलीस महासंचालकांमार्फत चौकशी; कोणालाही पाठीशी घालणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Jalna Maratha Protest : जालना मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी अप्पर पोलिस महासंचालक संजय सक्सेना यांच्यामार्फत चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम आज बुलढाण्यात पार पडला, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

Jalna Maratha Protest : घटनेच्या आधीच एकनाथ शिंदेंचा मनोज जरांगेला फोन; फोनवर काय बोलणं? मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मराठा आरक्षण आंदोलन करणाऱ्यांवर लाठीचार्ज झाल्याप्रकरणाची अप्पर पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांच्यामार्फत चौकशी करण्यात येईल, चौकशी अहवालानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, कोणालाही पाठीशी घालणार नसल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.

One Nation One Election साठी मोदी सरकारकडून समिती स्थापन, रामनाथ कोविंद यांच्यासह ‘या’ नेत्यांचा समावेश?

तसेच लाठीमाराची ही अत्यंत दुर्दैवी घटना असून या घटनेनंतर जालन्याचे पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही असे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

Fukrey 3 ‘या’ दिवशी होणार रिलीज! प्रेक्षकांना चित्रपटाची उत्सुकता

सर्वसामान्य मराठा कुटुंबात जन्मलेला मी एक असून मराठा समाजाच्या वेदनांची मला पूर्ण जाण आहे. मराठा समाजाला टिकेल असे आरक्षण मिळावे यासाठी शासन पूर्णपणे प्रयत्नशील असून त्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू असून लवकरच त्याबद्दल सकारात्मक निर्णय होईल असे त्यांनी सांगितले. तसेच जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोवर आपण स्वस्थ बसणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर साडेतीन हजार मराठा तरुण हे नोकरीपासून वंचित राहिले होते. त्यांना न्याय देण्यासाठी अधिसंख्य पदे भरण्याचा निर्णय आम्ही घेतला, सर्वसामान्य मराठा तरुणांना न्याय देण्यासाठी जेव्हा सगळे नेते गप्प होते तेव्हा न्यायालयाच्या अवमानाची परवा न करता आपण हा निर्णय घेतला. त्यामुळे मराठा समाजाला आपल्या पाठीशी नक्की कोण आहे याची पूर्ण कल्पना आहे असे यावेळी बोलताना स्पष्ट केले.

दरम्यान, मराठा समाज हा अत्यंत संवेदनशील पण तितकाच संयमी समाज आहे. यापूर्वी लाखांचे मोर्चे काढताना या समाजाने कधीही आपला संयम ढळू दिला नव्हता, त्यामुळे यापुढे देखील त्यांनी संयम बाळगावा, असे आवाहन शिंदे यांनी यावेळी बोलताना केले. आवश्यकता भासल्यास या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

Tags

follow us