Jalna Maratha Protest : घटनेच्या आधीच एकनाथ शिंदेंचा मनोज जरांगेला फोन; फोनवर काय बोलणं? मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं

Jalna Maratha Protest : घटनेच्या आधीच एकनाथ शिंदेंचा मनोज जरांगेला फोन; फोनवर काय बोलणं? मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं

Jalna Maratha Protest : जालन्यातील अंतरवली सराटी गावांत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनावर पोलिसांकडून लाठीचार्ज झाल्याची घटना घडली. घटनेच्या तीन दिवसांपूर्वीच शिवबा संघटनेचे मनोज जरांगे(Manoj Jarange) यांच्याशी फोनवर चर्चा झाली असल्याचं माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Cm Eknath Shinde) यांनी दिली आहे. बुलढाण्यात आयोजित केलेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात ते बोलत होते.

बस पेटवणारे, जाळपोळ करणारे कोण होते? मनोज जरांगे पाटलांनी सांगितली हकीकत

मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे बोलताना म्हणाले, जालन्यातल्या सराटी गावांत मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झालायं तो अत्यंत दुर्देवी आहे, सराटी गावांत आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्याशी माझं तीन दिवसांपूर्वीच बोलणं झालं होतं. उपोषण केल्याने मनोज जरांगे यांची प्रकृती खालावत चालली होती, जरांगेला प्रशासनिक अधिकारी उपचार घेण्याबाबत विनंती करीत होते, मी देखील फोनवर अॅडमिट होण्याबाबत सांगितलं होतं, पण दुर्देवाने ही घटना घडली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.

Pune : पाच अल्पवयीन मुलांकडून तरुणाची हत्या; दारुच्या नशेत दगडाने ठेचून घेतला जीव

तसेच या घटनेनंतर जालन्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांना मी सक्तीच्या रजेवर जाण्याचा निर्णय घेण्यास सांगितलं असून उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनाही जिल्ह्याबाहेर पाठवण्याबाबत सांगितले आहे, या घटनेनंतर अॅडिश्नल डिजी सक्सेना जालन्यातील लाठीचार्ज घटनेची चौकशी करणार असून दोषींना निलंबित करण्यात येणार असल्याची ग्वाहीच मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली आहे.

Thane Crime : पत्नीची गोळी झाडून हत्या, त्याचवेळी पतीचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू

मराठा आंदोलकांना मारहाण झाल्याप्रकरणी मलाही दुख: आहे, मी देखील गरीब मराठा असून या घटनेप्रकरणी वेळ पडल्यास न्यायालयीन चौकशीही करणार असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच लाठीचार्ज प्रकरणात कोणालाही पाठिशी घालणार नाही, पण कोणीही या घटनेचं राजकारण करु नये, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांनी इशारा दिला आहे.

दरम्यान, मराठा समाजाला आम्ही कधीही अंतर देणार नसून घटनेप्रकरणी विरोधकांकडून मयताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम करता केलं जात आहे, त्यामुळे बळी पडू नका, असं आवाहनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube