Download App

Irshalwadi Landslide : 36 तासांची झुंज यशस्वी! मातीच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या महिलेसाठी जवान ठरले ‘देवदूत’…

Raigad Irshalwadi Landslide Update : इर्शाळवाडीतल्या दुर्घटनेत मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका महिलेसाठी एनडीआरएफचे जवान देवदुतच ठरले आहेत. या महिलेची मातीच्या ढिगाऱ्याखाली तब्बल 36 तासांची झुंज यशस्वी झाली आहे. या महिलेला एनडीआरएफच्या जवानांनी जिवंत बाहेर काढले असून या थरारक घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Irshalwadi landslide : झोपड्या तोडणारे वनविभागाच आता आरोपाच्या पिंजऱ्यात

इर्शाळवाडी दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत 16 जणांना मृत्यूने गाठलं असून अद्यापही 100 जण मातीच्या ढिगाऱ्याखाली असल्याचं सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेनंतर एनडीआरएफच्या टीमकडून बचावकार्य सुरु असून बचावकार्य सुरु असतानाच मातीच्या ढिगाऱ्याखालून एका महिलेला जिवंत बाहेर काढलं आहे.

Maharashtra Council : उत्तर देण्यासाठी मुनगंटीवार परबांच्या घरी जाणार; वाचा खारघर घटनेवरून काय झालं?

इर्शाळवाडीतली घटना घडून आत्तापर्यंत 36 तासांपेक्षा अधिक ओलटून गेला आहे. अद्यापही अनेकजण मातीच्या ढिगाऱ्याखाली असतानाच श्वास घेत आहेत. कोणीतही येईन आणि इथून बाहेर काढील, अशी आसं लावून अनेकांची मृत्यूंशी झुंज सुरु आहे.

महाराष्ट्रात याआधीही अनेकदा अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्याच्या घटना घडल्यात. आधी माळीण, तळीये आता रायगडच्या इर्शाळवाडी गावच दरड कोसळल्याने जमिनदोस्त झालं आहे. इर्शाळवाडी हे गाव घनदाट डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं असून अतिवृष्टीमुळे रात्रीच्या सुमारास अचानक डोंगराचा काही भाग कोसळला. त्यानंतर हे संपूर्ण गावचं मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेल्याचं पाहायला मिळालं.

‘शुभेच्छा शतकोटी, ‘अजित’ महाराष्ट्रासाठी’ : आणखी एका आमदाराने सोडली शरद पवारांची साथ?

बचावकार्यादरम्यान, ढिगाऱ्याखाली एक महिला असल्याचं एनडीआरएफच्या पथकाच्या लक्षात आलं. ज्यावेळी पथकांने समजलं तेव्हा ही महिला जिवंत असेल की नाही, याबाबत अस्पष्टता होती. एनडीआरएफ जवानांनी अथक परिश्रम घेत या महिलेला ढिगाऱ्याच्या बाहेर काढलं आहे.

एनडीआरएफच्या जवानांनी तिला बाहेर काढल्यानंतर महिला जिवंत असल्याचं समजलं. ही महिला घटना घडल्यानंतर जवळपास 36 तासांपेक्षा अधिक काळ मातीच्या ढिगाऱ्याखाली होती. 36 तास तिने मृत्यूंशी दिलेली झुंज अखेर यशस्वी ठऱली आहे. दरम्यान, या महिलेला ढिगाऱ्यातून बाहेर काढल्यानंतर तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचं समोर आलं आहे.

Tags

follow us