Maharashtra Council : उत्तर देण्यासाठी मुनगंटीवार परबांच्या घरी जाणार; वाचा खारघर घटनेवरून काय झालं?

Maharashtra Council : उत्तर देण्यासाठी मुनगंटीवार परबांच्या घरी जाणार; वाचा खारघर घटनेवरून काय  झालं?

Maharashtra Assembly Session : खारघरच्या इव्हेंटचे कंत्राट दिलेल्या कंपनीने करारातील अटी व नियमांचे उल्लंघन केले आहे का? त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाणार आहे का? असा मुद्दा विधानपरिषदेत उपस्थित करण्यात आला होता. यावरुन मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि आमदार अनिल परब यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली.

विधानपरिषदेचे कामकाज सुरु झाल्यानंतर प्रश्नोत्तराच्या तासात खारघर घटनेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. यावर अनिल परब म्हणाले की कार्यक्रमाचे आयोजन केलेल्या कंपनीने सरकारसोबत करार होता. घटना घडल्यानंतर सरकारने सांगितले होते की तीन महिन्यात अहवाल जाहीर करणार. पण त्या कंपनीने करारातील अटींचे उल्लंघन केले आहे का? केलं असेल तर तो कंत्राटदार कोण होता? त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार का? असा सवाल अनिल परब यांनी केला होता.

Aditya Thackery : पालिकेच्या केबिन मंत्र्यांना बिल्डिंग उभारण्यासाठी देत आहात का? आदित्य ठाकरेंचा सवाल

सुधीर मुनगंटीवार उत्तर देताना म्हणाले की हाय कोर्टात पीआयएल दाखल झालेली आहे. यावरुन सभागृहात गोंधळ झाला होता. अनिल परब यांनी यावर अक्षेप घेतला. यावर मुनगंटीवार म्हणाले की उत्तर आले नाही, माझ्या उत्तराने समाधान झाले नाही तर सभागृह संपेपर्यत उत्तर द्यायला तयार आहे, सभापतींनी प्रश्न थांबवला तर मी तुमच्यासोबत दालनात बसून उत्तर द्यायला आहे, तरी तुमचे समाधान झाले नाही तर तुम्ही मला निमंत्रण द्या तुमच्या घरी येऊन उत्तर द्यायला तयार आहे. लपवण्यासारखे काहीच नाही, असे मुनगंटीवार म्हणाले.

तुम्ही आमच्या घरापर्यंत आलात. येऊन येऊन थकलात असा टोला अनिल परब यांनी मुनगंटीवार यांना लागवला. त्यानंतर मुनगंटीवार म्हणाले मी तसा येत नाही. जे येऊन थकवतात तशापैकी मी नाही. त्यामुळे चिंता करु नका. खारघर प्रकरणावरुन अनिल परब आणि मुनगंटीवार यांच्यात काही वेळ खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले.

नगर जिल्हा विभाजनाचा मुद्दा विधानसभेत…आमदार कानडेंनी केली महत्वाची मागणी

मुनगंटीवार उत्तरात म्हणाले त्या कंपनीने करारानुसार काम केले का नाही? हे अतिरिक्त मुख्य सचिव तपासत आहेत. म्हणून त्यांचे जे पैसे द्यायचे होते सरकारला ते अजून दिलेले नाहीत. कंपनीचे नाव माझ्याकडे नाही. अवश्यक असेल तर पटलावर मांडतो, असे त्यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube