Download App

‘भाजपवाले हरामखोरच’; चिपळूणच्या सभेत उद्धव ठाकरेंचा घणाघात

Udhav Thackeray ON BJP : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून जोरदार तयारी सुरु आहे. सध्या राज्यात ठाकरे गटाकडून जनसंवाद यात्रा सुरु आहे. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये आज ही सभा पार पडली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी भाजपसह शिंदे गटाच्या नेत्यांवर बोलून चिरफाड केल्याचंच दिसून आलं आहे. सगळं काही देऊनही लाळघोटे भाजपसोबत गेले आहेत, अशी टीका ठाकरेंनी शिंदे गटावर केली तर कमळाबाईला आपलं पक्ष संपवायचा होता. 2014 पासून पक्ष फोडत होता. मी पक्षप्रमुख नव्हतो. तर 2014 साली माझ्या पाठिंब्याची सही का घेतली? 2019 पुन्हा युती जोडण्यासाठी मातोश्रीवर का आलात? तो मिंध्ये म्हणतो पक्षप्रमुख आहे. तेव्हा त्याच्याकडे का गेला नाहीत? ज्याचा घराण्याचा संबंध नाही तो आम्हाला घराणेशाही सांगतो. भाजपवाले हरामखोर असल्याचा घणाघात उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला आहे.

Poonam Pandey: “आम्ही फक्त..” : पुनम पांडेच्या खोट्या मृत्यूची स्क्रिप्ट लिहिणारा ‘ब्रेन’ अखेर माध्यमांसमोर

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, संकटाच्या गोष्टी जेव्हा येतात तेव्हा आजूबाजूचे लोकांचे बुरखे फाटतात. सगळं देऊनसुद्धा ज्यांची लाळ गळत असते ते मुखवटे गेल्यावर कळतं हे लाळघोटे आज भाजपसोबत गेले. चिपळूणमध्ये धरणं फोडणारे खेकडे गेलेत. खेकडा हा नेहमी तिरकाच चालणार. सर्वोच्च न्यायालयाकडून आशा आहे न्याय मिळेल पण सर्वोच्च न्यायालयाच्या बरोबरीने जनतेचं न्यायालय आहे. जनता न्यायालयात याआधीही कोणत्याही राजकीय पक्षाने बाजू मांडलेली नाही. आम्ही पाप नाही केलं म्हणून आम्ही लोकांमध्ये जातो. माझ्याकडे देण्यासाठी काही नाही तरीही आज एकही माणूस भाड्याने आणलेला नाही माझ्याकडे भाडखाऊ माणसं नाहीत अशी टीका उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर केलीयं.

श्रीकांत शिंदेंची गुंड हेमंत दाभेकरशी भेट घडवणं भोवलं, अनिकेत जावळकरची युवा सेनेतून हकालपट्टी

कमळाबाई हे नाव भाजपला बाळासाहेबांनी दिलं आहे. कमळाबाईला वाटलं की शिवसेना संपेल 2014 सालीच ते संपवायला निघाले होते. मोदी घराणेशाहीविरोधात टाहो फोडतात पण 2014 ला मीच पक्षप्रमुख होतो. मग तुम्हाला कोणाचा पाठिंबा घेतला होता. राष्ट्रपती प्रणव मुखर्जींकडे तेव्हा मला का नेलं होतं. तेव्हा पंतप्रधान पदाच्या पत्रावर माझी सही का घेतली होती. अमित शाह यांनी 2018 साली पुन्हा युती करण्यासाठी का आले होते. मिंध्याकडे का नव्हते गेले? असा प्रश्नांचा भडीमार उद्धव ठाकरेंनी केला आहे.

follow us