Ladki Bahin Yojana : राज्यातील सर्वात लोकप्रिय योजना लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. या अपडेटनुसार, या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना फेब्रुवारीच्या हप्त्याची जास्त वाट पाहावी लागणार नाही. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबत संभाव्य तारीख समोर आली आहे.
जानेवारीचा हप्ता लांबणीवर गेल्याने फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार? असा प्रश्न विचारण्यात येत होता. मात्र आता फेब्रुवारी महिन्या हप्ता कधी मिळणार याबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. या अपडेटनुसार, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लाभार्थी महिलांना 1500 रुपये मिळू शकतात. आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन असल्याने या दिवशी लाडक्या बहिणींच्या (Ladki Bahin Yojana) खात्यात फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
6 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प (Budget 2026) सादर करण्यात येणार असल्याने या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेबाबत तरतुद करण्यात येऊ शकते आणि यानंतर आठ मार्च रोजी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे याबाबत आतापर्यंत राज्य सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
इराणची मोठी कारवाई, सौदी अरेबियातील अमेरिकन दूतावासावर ड्रोन हल्ला; ट्रम्प देणार प्रत्युत्तर?
गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांची नावे वगळण्यात आली आहे. फक्त केवायसी केलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहे. त्याच महिलांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा केल्या जाणार आहे.
