राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये बंडखोरीनंतर अजित पवार हे भाजप-शिवसेना सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाल्याने राज्याच्या राजकारणात मोठा गदारोळ सुरु झाला आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस, ठाकरे गटाच्या नेत्यांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. त्यांनी मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार तोफ डागली.
काँग्रेस म्हणू,
काँग्रेसच आणू… pic.twitter.com/5ispKLdRm6— Ashok Chavan (@AshokChavanINC) July 2, 2023
शिवसेना व राष्ट्रवादी दोन्ही पक्ष फुटले आहेत. महाविकास आघाडीत आता काँग्रेस एकच पक्ष उरला आहे. ज्याच्याकडे 34 आमदारांचं संख्याबळ आहे. महाविकास आघाडीतील हा पक्ष मजबूत मानू लागला आहे. त्या दृष्टीने आता काँग्रेसनेही याच भांडवल सुरु केल्याचं नेत्यांच्या ट्विटवरुन दिसून येत आहे.
राष्ट्रवादी फुटली : अजितदादा आणि छगन भुजबळांचा तातडीने शपथविधी…
काँग्रेसने आता कॉंग्रेस म्हणू अन् काँग्रेसच आणू असा ट्विटर ट्रेंड सुरु केला आहे. काँंग्रेस नेते अशोक चव्हाण, सतेज पाटील, यांनी हे ट्विट केलं आहे. अंतिम सत्य आणि एकमेव शाश्वत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असा प्रचार सतेज पाटील यांनी सुरु केला आहे.
ODI WC: अर्धा संघ जखमी, अनेक स्टार फलंदाज आउट ऑफ फॉम, कसे पूर्ण होणार विश्वचषकाचे स्वप्न?
अजित पवारांनी आज सकाळी राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीनंतर थेट राजभवन गाठत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. एवढंच नाहीतर अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा केलायं. या सर्व घडामोडींवर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत अजित पवारांच्या भूमिकेला आमचा पाठिंबा नसून आम्हाला चिंता नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
बीआरएसने दिलेल्या ऑफरवर विचार करणार नाही असं नाही; पंकजा मुडेंचं सूचक वक्तव्य
दोनच दिवसांपूर्वी लोकसभेच्या जागेबाबत अजित पवारांना अशोक चव्हाण भेटले होते. आता त्याचीही जोरदार चर्चा सुरु झाली आहे. काँग्रेसचे काही नेते पृथ्वीराज चव्हाण आणि इतर नेत्यांसोबत अजित पवारांचे खटके उडत होते. जागावाटपावरुनही तिन्ही पक्षांमध्ये मतभेद झाल्याचं पाहायला मिळालं होतं.
राज्यातील राष्ट्रवादी शिवसेना हे दोन पक्ष फुटलेत त्यामुळे महाविकास आघाडीतील मोठा घटक पक्ष काँग्रेसच असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य निवडणुका विधानसभा, लोकसभा, निवडणुकीत अधिका जागा मिळवण्याचा काँग्रेसचा दावा राहणार आहे. या नेत्यांचे ट्विट हेच दर्शवत आहेत. दोन्ही पक्ष फुटले तरी आम्ही मजबूत आहोत असंच या नेत्यांना या ट्विटच्या माध्यमातून संदेश द्यावयाचा असल्याचं दिसून येतंय.