ODI WC: अर्धा संघ जखमी, अनेक स्टार फलंदाज आउट ऑफ फॉम, कसे पूर्ण होणार विश्वचषकाचे स्वप्न?
ICC World Cup 2023 Team India Weakness आयसीसी विश्वचषक 2023 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. तब्बल 12 वर्षांनंतर भारतीय संघ या जागतिक दर्जाच्या स्पर्धेचे यजमानपदासाठी सज्ज झाला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाही जेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जात आहे. रोहितचा संघ घरच्या परिस्थितीचा फायदा घेऊन चमत्कार करू शकतो, असे अनेक माजी दिग्गजांचे म्हणणे आहे. (team-india-weaknesses-which-captain-rohit-sharma-and-team-managment-should-see-before-icc-world-cup2023)
मोठ्या गोष्टी सांगायला आणि ऐकायला खूप छान वाटत असले तरी प्रत्यक्षात भारतीय संघ किती पाण्यात आहे हेही तुम्हाला कळायला हवे. स्टार खेळाडू दुखापतींशी झगडत आहेत, त्यामुळे संघासोबत उपस्थित असलेल्या खेळाडूंचा अलीकडचा फॉर्म हाच मोठा प्रश्न आहे. कर्णधार रोहित आणि संघ व्यवस्थापनाला आता डोळे का उघडण्याची गरज आहे हे आम्ही तुम्हाला सविस्तरपणे समजावून सांगू.
अर्ध्याहून अधिक संघ जखमी
जसप्रीत बुमराह – दुखापतीतून सावरण्यात व्यस्त आहे. आशिया कपपर्यंत बूम-बूमचे पुनरागमन होऊ शकते, असे मानले जात आहे. तथापि, हे लक्षात ठेवा की बुमराह गेल्या जवळपास एक वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे, त्यामुळे तो 22 यार्डच्या खेळपट्टीवर येताच तो चमत्कार करेल असे वाटणे योग्य नाही.
ऋषभ पंतची अवस्था बुमराहपेक्षाही वाईट आहे. हा भारतीय यष्टीरक्षक विश्वचषक खेळणार की नाही यावर अजूनही प्रश्न आहे. पंत तंदुरुस्त झाला तरी त्याला त्याच्या फिटनेसवर खूप मेहनत करावी लागेल.
श्रेयस अय्यर विश्वचषकापर्यंत तंदुरुस्त नसल्याच्या बातम्या येत आहेत. केएल राहुलच्या फिटनेसबाबतही आजपर्यंत काही आनंदाची बातमी समोर आलेली नाही. म्हणजेच ज्या खेळाडूंकडून टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवण्याची अपेक्षा होती, तेच खेळाडू आपापली वेगळी लढाई लढत आहेत.
Ravi kishan: सुप्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्याची लेक होणार भारतीय सैन्यात भरती; जाणून घ्या तिच्याबद्दल
आउट ऑफ फॉम खेळाडू
कर्णधार रोहित शर्माचा अलीकडचा फॉर्म टीम इंडियासाठी सर्वात मोठा चिंतेचा विषय आहे. रोहितने गेल्या तीन वर्षांत 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये एकूण एक शतक झळकावले आहे. हिटमॅनला विश्वचषकातील भारतीय संघाचे ट्रम्प कार्ड म्हटले जात आहे, परंतु रोहितचे आकडे वेगळीच कथा सांगत आहेत.
केवळ रोहितच नाही तर टी-20चा मास्टर म्हटला जाणारा सूर्यकुमार यादवचा वनडे फॉम खूपच वाईट आहे. 23 सामन्यांच्या एकदिवसीय कारकिर्दीत, सूर्याने फक्त दोन अर्धशतके झळकावली आहेत आणि शतकाच्या जवळपासही पोहोचू शकला नाही. भारताचे भविष्य मानल्या जाणाऱ्या शुभमन गिलला अद्याप आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या स्पर्धेत कामगिरी करता आलेली नाही. इशान किशनने द्विशतक झळकावले, पण त्यानंतर त्याने खेळलेल्या चार एकदिवसीय डावांमध्ये एकूण 33 धावा केल्या. के.एल.राहुलचा अलीकडचा फॉर्म काय चालला आहे हे बहुधा सांगायची गरज नाही.