Recruitment : मोठ्या आवेशात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ७५ हजार जागांच्या महाभरतीची (Exams) घोषणा करण्यात आली होती. मात्र, कोणत्या ना कोणत्या कारणाने ही भरती रखडल्याचं दिसून आलंय. (Recruitment) वारंवरावर रखडल्याने उमेदवारांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. (Mpsc) त्यातच शासन सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय वाढवण्याच्या विचारात असल्याने उमेदवारांच्या अस्वस्थेव मिठ चोळल्यासारखं होत आहे.
भरती प्रक्रिया सुनियोजित नाही धक्कादायक! UGC NET 2024 परीक्षेचा पेपर फक्त 5 हजारातच फुटला
राज्यातील १५ पेक्षा अधिक विभागांतील भरती प्रक्रियाच घोषित झालेली नाही. तर तलाठी आणि जिल्हा परिषदेची भरती परीक्षा होऊनही उमेदवारांना नियुक्तीपत्र मिळालेलं नाही. याबाबत स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या अनेक लोकांनी राज्यातील एकही भरती प्रक्रिया सुनियोजित पद्धतीने झाली नसल्याचं भयानक विदारक सत्य सांगितलं आहे.
विद्यार्थी सत्ताधाऱ्यांवर संतप्त
सरकारने ७५ हजार जागांच्या भरतीची घोषणा केली. मात्र, अजूनही अनेक जागांची भरती रखडली आहे. दरम्यान, राज्यात दोन लाखांहून अधिक जागा रिक्त आहेत. रखडलेल्या भरतीमुळे विद्यार्थी सत्ताधाऱ्यांवर संतप्त आहेत. शासनाने तातडीने निर्णय घेत विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक असल्याचंही विद्यार्थ्यांचं मत आहे.
अधिवेशनात चर्चा व्हावी बिहारमध्ये आरक्षणाचा फॉर्म्युला फेल! महाराष्ट्रातही 62 टक्क्यांवर; टिकणार की फेल ठरणार?
सर्व नोकरभरती ‘एमपीएससी’द्वारे राज्यातील विविध सरळसेवा भरती प्रक्रिया वेगवेगळ्या कारणाने वादात सापडल्या आहेत. अनेक भरती प्रक्रियेत खासगी संस्थांनी गैरव्यवहार केल्याचं उघड झालं आहे. म्हणून पारदर्शक आणि विश्वासार्ह भरती प्रक्रियेसाठी सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करण्यात आली आहे. ज्याद्वारे सर्व पदांची भरती ‘एमपीएससी’च्या माध्यमातून होणार आहे. मात्र, त्याबद्दल कोणतीच कारवाई झालेली नाही.
जाहिरात येणे बाकी
अर्ज भरले पण वेळापत्रक नाही
नवीन जाहिराती अपेक्षित