Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी विधानसभेनंतर कोणता पक्ष मोठा असेल यावर थेट भाष्य केलं आहे. (Devendra Fadnavis) महाराष्ट्र विधानसभेनंतर सर्व पोल खोटे ठरतील आणि भाजप हा सर्वात मोठा पक्ष असेल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वातावरणात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
महायुतीत भाजप, शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आहे. महायुती म्हणून या विधानसभा आम्हाला विजय नक्की मिळेल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. एकट्या भाजपला स्वबळावर विजय मिळणार नाही. मात्र, मित्रपक्षाच्या मदतीने विजय नक्कीच मिळेल. त्यातही भाजप हा सर्वात मोठा पक्ष असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महायुती असल्याने अनेक गोष्टीत तडजोड करावी लागली आहे. त्यामुळे पक्षातील चांगल्या लोकांवर अन्याय झाला आहे हे मान्य आहे. त्याचं वाईट नक्कीच वाटतं असंही फडणवीस म्हणाले आहेत.
गेवराईत २०१९ ची पुनरावृत्ती?, अजित पवारांची विजयसिंह पंडितांना उमेदवारी, लक्ष्मण पवार अपक्ष?
प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते. मतदार हे सर्वांनाच आश्चर्यचकीत करत असतात. हरियाणा त्याचं उत्तम उदाहरण आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला बऱ्यापैकी यश मिळालं. मात्र, ते फेक नरेटिव्हमुळे मिळाले होते असंही फडणवीस म्हणाले आहेत. मात्र, हे फेक नरेटिव्ह विधानसभा निवडणुकीत चालणार नाही. आघाडी आणि युतीमधील मतांचे अंतर हे फार कमी आहे. काँग्रेसच्या फेक नरेटिव्हला युती थेट नरेटिव्हने उत्तर दिले आहे. त्यामुळे या निवडणुकीत युतीचा विजय निश्चित आहे असंही ते म्हणाले आहेत.
भाजपने उमेदवारी देताना विद्यमान आमदारांनाच पुन्हा मैदानात उतरवलं आहे. तर काहींना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. याबाबतही देवेंद्र फडणवीस यांनी मोठा खुलासा केला आहे. उमेदवारी देताना तीन प्रकारचा अभ्यास केला गेला. त्यानंतर उमेदवारी निश्चित करण्यात आली. त्यात विद्यमान आमदारांबाबत नाराजीचा अभ्यास केला गेला. शिवाय ज्यांच्या बाबतीत नाराजी जास्त त्यांना उमेदवारी नाही, ज्यांच्याबाबत नाराजी कमी त्यांना मात्र उमेदवारी देण्यात आली आहे असंही ते म्हणाले आहेत.