Download App

‘मी आठवलेंना भेटणार, त्यांच्याशी बोलणार, पक्षात आलो तर’… ‘त्या’ ऑफरवर भुजबळांनी दिलं उत्तर

Chagan Bhujbal replies Ramdas Athawale’s offer : आरपीआय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांना पक्षात येण्याची ऑफर दिली होती. त्यांच्या या ऑफरवर आज स्वतः भुजबळ यांनी अत्यंत खुमासदार पद्धतीने उत्तर दिले. या ऑफरसंदर्भात रामदास आठवले यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

भुजबळ यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना आठवले यांच्या ऑफरबाबत विचारले. त्यावर भुजबळ म्हणाले, आठवलेंनी जे मला आमंत्रण दिलं आहे त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मी त्यांना भेटणार आहे. मी जर त्यांच्या पक्षात गेलो तर कुठल्या पदावर माझी नेमणूक होईल यासंदर्भात चर्चा करून मग मी ठरवणार आहे. भुजबळ यांनी असे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आता भुजबळ खरंच आठवले यांची भेट घेणार का, त्यांच्यात काय चर्चा होणार असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.

OBC प्रदेशाध्यक्षाची मागणी अन् भुजबळ राष्ट्रवादीत साईडलाईन? आठवलेंची खुली ऑफर

नेमकं घडलं काय?

काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्याला संघटनेत जबाबदारी द्यावी अशी मागणी केली होती. त्यानंतर ते प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली होती. अशातच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रदेशाध्यक्षपदी ओबीसी समाजातील चेहऱ्याला संधी द्यावी, अशी भूमिका मांडली होती.

मात्र राष्ट्रवादीतील अन्य कोणताही बडा नेता भुजबळांच्या मागणीचे समर्थन करताना दिसला नाही. त्यामुळे भुजबळ राष्ट्रवादीत एकटे पडले अन् नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं. यानंतरच आरपीआयचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी छगन भुजबळांना थेट आरपीआयमध्ये येण्याची ऑफर दिली.

Maharashtra Cabinet Decisions : शिंदे सरकारचा मास्टरस्ट्रोक! वांद्रे-वर्सोवा सागरी सेतुला सावरकरांचं नाव

काय म्हणाले होते आठवले?

आठवले मंगळवारी नगरमध्ये आले होते. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, छगन भुजबळ नाराज असतील तर त्यांनी आरपीआयमध्ये यावे. त्यांना माझे निमंत्रण आहे. न्याय मिळत नसेल तर अन्याय सहन करू नका. मी आणि भुजबळ डॅशिंग नेते असल्याचे आठवले यांनी सांगितले

Tags

follow us