OBC प्रदेशाध्यक्षाची मागणी अन् भुजबळ राष्ट्रवादीत साईडलाईन? आठवलेंची खुली ऑफर

  • Written By: Published:
OBC प्रदेशाध्यक्षाची मागणी अन् भुजबळ राष्ट्रवादीत साईडलाईन? आठवलेंची खुली ऑफर

Ramdas Athawale On Chhagan Bhujbal : काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्याला संघटनेत जबाबदारी द्यावी अशी मागणी केली होती. त्यानंतर ते प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली होती. अशातच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रदेशाध्यक्षपदी ओबीसी समाजातील चेहऱ्याला संधी द्यावी, अशी भूमिका मांडली.

मात्र राष्ट्रवादीतील अन्य कोणताही बडा नेता भुजबळांच्या मागणीचे समर्थन करताना दिसला नाही. त्यामुळे भुजबळ राष्ट्रवादीत एकटे पडले अन् नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर आरपीआयचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी छगन भुजबळांना थेट आरपीआयमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. (Ramdas Athawale open offer to Chhagan Bhujbaj to join RPI)

जाहिरातवाद, समन्वय समितीची बैठक अन् सेना-भाजपची खलबतं!

आठवले हे मंगळवारी नाशिक आणि अहमदनगरच्या दौऱ्यावर होते. दोन्ही ठिकाणी माध्यमांशी बोलताना आठवले यांनी भुजबळांना ऑफर दिली आहे. नगरमध्ये माध्यमांशी बोलताना आठवले म्हणाले, राष्ट्रवादीमध्ये मराठा समाजातील नेत्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे ओबीसीला संधी मिळत नाही. ओबीसी समाजावर अन्याय होत आहे. छगन भुजबळांचे प्रदेशाध्यक्षपदाची संधी द्यावी हे वक्तव्य हेच सिध्द करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मराठा समाजाच्या हातात आहे. शरद पवारांची भूमिका व्यापक असली तरी ओबीसी, दलित समाजाचा प्रतिनिधीत्व मिळत नसल्याचा टोलाही आठवले यांनी लगावला आहे.

सुनील केंद्रेकरांची स्वेच्छानिवृत्ती; बीड लोकसभेचा उमेदवार ठरला? पण ‘ते’ तर म्हणतात…

त्याचबरोबर छगन भुजबळ नाराज असतील तर त्यांनी आरपीआयमध्ये यावे. त्यांना माझे निमंत्रण आहे. न्याय मिळत नसेल तर अन्याय सहन करू नका. मी आणि भुजबळ डॅशिंग नेते असल्याचे आठवले यांनी सांगितले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी माझी भूमिका आहे. सर्वच मराठा समाज श्रीमंत नाही. परंतु मराठा म्हणजे जमीनदार, उद्योगपती, सत्ताधारी अशी प्रतिमा मराठा समाजाची झालेली आहे. गरिब मराठ्यांना आरक्षण मिळविण्यासाठी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात चांगली बाजू मांडावी, असे आवाहन आठवले यांनी केले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube