जाहिरातवाद, समन्वय समितीची बैठक अन् सेना-भाजपची खलबतं!

जाहिरातवाद, समन्वय समितीची बैठक अन् सेना-भाजपची खलबतं!

Shivseana and BJP :  भाजप अन् शिवसेना या दोन्ही पक्षातील समन्वय समितीची बैठक आज पार पडली. मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात ही बैठक संपन्न झाली. या बैठकीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील यासह शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई, उदय सामंत, शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के ही नेते मंडळी उपस्थित होती. दोन्ही पक्षांमध्ये समन्वयाची चर्चा झाल्याचे या नेत्यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना अन् भाजपमध्ये काही अलबेल नसल्याची चर्चा होती. शिवसेनेच्या 5 मंत्र्यांची मंत्रिमंडळातून गच्छंती होणार असे बोलले जात होते. त्याचवेळी कल्याण-डोंबिवली या लोकसभा मतदारसंघावर भाजपेने दावा सांगितला होता. त्याचदरम्यान, सर्व वृत्तपत्रांमध्ये एक जाहिरात प्रसिद्ध झाली अन् सर्वत्र एकच खळबळ उडाली. त्यात ‘देशात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ असे लिहिण्यात आले होते व फक्त पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो लावण्यात आला होता. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपेक्षा शिंदेंची लोकप्रियता अधिक दाखवली होती. त्यामुळे भाजप अन् शिवसेनेत मीठाचा खडा कोण टाकतयं अशी चर्चा रंगली होती.

शरद पवारांची ‘ती’ मुत्सद्देगिरी ते ठाकरेंचं बंद दार; देवेंद्र फडणवीसांनी सगळंचं बाहेर काढलं…

या सर्व वादानंतर आज शिवसेना आणि भाजपच्या होणाऱ्या बैठकीकडे सगळ्यांचे डोळे लागले होते. या बैठकीत जागावाटप अन् युतीमधील वाद यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात होती.  या बैठकीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही पक्षांमध्ये एक समन्वय असावा यासाठी ही बैठक होत असते. त्यानिमित्ताने आज ही बैठक झाली. एखाद्या परिवारामध्ये मतभेद होत असतात. पण आमच्यात मनभेद नाही. आजच्या बैठकीचा तो संदर्भही नाही. शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्ष भाऊ आहे. एखाद्या जिल्ह्यात किंवा तालुक्यात समन्यव बिघडला तर आम्हा वरिष्ठ नेत्यांना तो नीट करावा लागतो. याकरिता आम्ही महिन्यातून एकद बैठक घेत असतो, असे बावनकुळेंनी सांगितले.

नेमकं चुकलं कोण? शरद पवार की फडणवीस? भाजप नेत्यानं वीकिपीडियाचाच दिला पुरावा

यानंतर शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. देसाई म्हणाले की,  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे समन्वयाने काम करत आहेत. त्यांच्यामध्ये जो समन्वय आहे, तो गाव पातळीपर्यंत व बूथपातळीपर्यंत जावा यासाठी आमची ही बैठक होती. आगामी 2024 ची लोकसभा आणि विधानसभा आहे त्यापेक्षा अधिक बहुमताने जिंकणं हे आमचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितले.

या दोन्ही नेत्यांच्या बैठकीनंतर शिवसेना-भाजप युतीमध्ये सारं काही अलबेल असल्याचे बोलले जात आहे. तसेच आगामी विधानसभा व लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकमेकांची गरज असल्याचे राजकीय विश्लेषकांनी सांगितले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षात कितीही कलगीतुरा असला तरी हे दोन्ही पक्ष एकत्र राहणार असे बोलले जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube