Governor C P Radhakrishnan ON Hindi Language : मराठी आणि हिंदी वादात राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी उडी घेतली आहे. त्यांच्या विधानानंतर आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. (Hindi ) कोणी मला मारलं तर मी लगेच मराठी बोलू शकणार आहे का, असं वक्तव्य राज्यपालांनी केलंय. भाषेवरून द्वेष पसरवला तर राज्याचंच नुकसान होईल, असंही ते म्हणालेत.
तुम्ही मराठी भाषेत बोलले नाही तर तुम्हाला मारले जाईल, असं धोरण तामिळनाडूमध्येही राबवलं जात आहे. तुम्ही येऊन मला मारलं तर मी लगेच मराठी बोलू शकेन का? मारल्यानंतर मी लगेच मराठी बोलणे शक्य आहे का? असं विधान राज्यपाल राधाकृष्णन यांनी केलंय. तसंच, आपण अशा प्रकारचा द्वेष पसवरला तर राज्यात कोणता गुंतवणूकदार येईल का? सवाल त्यांनी उपस्थित केलाय. तसंच छोट्याशा राजकीय लाभासाठी आपण असं करणं चुकीचं असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलंय.
Video : हिंदी भाषेसाठी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री लढतो?, राज ठाकरेंचा थेट फडणवीसांवर घाव
राज्यपालांनी राजकीय वक्तव्य करणं हे योग्य नाही. त्यांचं पद हे संविधानिक आहे. मी अगोदरच सांगितलेलं आहे की हिंदीला कोणाचाही विरोध नाही. पण पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीला आमचा विरोध आहे. मला वाटतं केंद्र सरकारनेही आमचीच भूमिका मांडली आहे. मग राज्यपालांनी जे विधान केलेय ते लक्षात घेतले तर राज्यपाल केंद्र सरकारच्या विरोधात आहेत का? असा सवाल आता शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलाय.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून त्रिभाषा सूत्रानुसार केलेल्या हिंदी सक्तीला राज्यभरातून विरोध करण्यात आला होता. विरोधकांनी काहीही झालं तरी हिंदी हा विषय इयत्ता पहिलीपासून सक्तीचा होऊ देणार नाही, असा पवित्रा घेतला होता. त्यानंतर वाढता विरोध पाहून आता सरकारने हिंदी भाषासक्तीचे सर्व शासन निर्णय रद्द केले आहेत. हा वाद अलिकडेच मागे पडला होता. मात्र, आता राज्यपालांच्या वक्तव्याने तो पन्हा एकदा उफाळून येण्याची शक्ताय आहे.