Download App

भाजपाचा माइंडगेम! रत्नागिरी घ्या पण, ठाणे किंवा कल्याण द्या; नव्या अटीने शिंदेंची कोंडी

BJP Shivsena Seat Sharing : महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. या तिढ्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांचे (Eknath Shinde) पुत्र श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी घोषित करता आलेली नाही. रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा शिवसेनेसाठी सोडण्याची तयारी (Shivsena) करणाऱ्या भाजपने ठाणे किंवा कल्याण यांपैकी एक जागा मिळावी यासाठी आग्रह धरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. भाजपकडून या जागांसाठी दबाव टाकला जात असला तरी श्रीकांत शिंदे यांनी (Shrikant Shinde) मात्र निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे.

Loksabha Election 2024 : साताऱ्याच्या जागेवर नेमकं कोण लढणार? पृथ्वीराजबाबांनी केली भूमिका जाहीर

महायुतीतील जु्न्या जागावाटपानुसार रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ शिवसेनेचा हक्काचा आहे. या मतदारसंघात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत इच्छुक आहेत. त्यांनी आपली इच्छा अनेकदा बोलून दाखवली आहे. इतकेच नाही तर वेळप्रसंगी बंडखोरी करण्याचीही त्यांची तयारी आहे. परंतु, या जागेवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासाठी भाजपने दावा केला होता. या खेळीनंतर महायुतीत तणाव निर्माण झाला होता. शिंदेसेना जागा सोडण्यास तयार नाही. त्यामुळे भाजपने दुसरा डाव टाकला आहे.

रत्नागिरी मतदारसंघ घ्या परंतु, ठाणे किंवा कल्याण मतदारसंघ आम्हाला द्या अशी मागणी भाजप नेत्यांनी केल्याचे समजते. या अटीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चांगलीच कोंडी झाली आहे. कल्याण मतदारसंघात श्रीकांत शिंदे स्वतः खासदार आहेत. या मतदारसंघातून त्यांनी पुन्हा तयारी सुरू केली आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री पुत्राच्याच मतदारसंघावर दावा ठोकण्याची तयारी भाजपने केली आहे. तर दुसरीकडे ठाणे मतदारसंघ मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतिष्ठेचा केला आहे. आता या मतदारसंघावरही भाजपकडून दावेदारी केली आहे.

Loksabha Election 2024 : काँग्रेसला दिलासा! ‘त्या’ प्रकरणात होणार नाही कारवाई, प्राप्तिकर विभागाकडून मोठा निर्णय

परंतु, नवी मुंबईतील शिवसेनेच्या शिबिरात पदाधिकाऱ्यांनी या मतदारसंघावर दावा केला. कोणताही उमेदवार असला तरी चालेल पण तो शिवसेनेचाच असला पाहिजे अशी मागणी या पदाधिकाऱ्यांनी केली. त्यांच्या या मागणीनंतर मुख्यमंत्री भाजपाच्या दबावासमोर माघार घेतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us

वेब स्टोरीज