मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेल्या दारूण पराभवासाठी भाजपसह अनेकांनी अजित पवारांना (Ajit Pawar) जबाबदार धरले होते. त्यानंतर आता भाजपनं ऐन विधानसभेच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार पाडत महाराष्ट्र ते झारखंड राजकीय प्रँक खेळण्यास सुरूवात केली आहे. (BJP Political Game On Ajit Pawar)
एक आमदार असलेल्या पक्षालाही CM व्हायला आवडेल; अजितदादांच्या ‘त्या’ वक्तव्यावर फडणवीसांचे भाष्य
महाराष्ट्र ते झारखंड अजित पवारांसोबत भाजपचे राजकीय प्रँक
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये 2024 च्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्र आणि झारखंड या दोन्ही राज्यात अजित पवारांचा पक्ष भाजपप्रणित एनडीएसोबत मित्रपक्षाच्या भूमिकेत आहे. मात्र, त्यानंतरही या दोन्ही ठिकाणी भाजप अजितदादांना धक्का देण्याचा प्रयत्नात असल्याची चर्चा आहे.
भाजपनं फोडला राष्ट्रवादीचा एकमेव आमदार
महाराष्ट्रासह झारखंडमध्ये येत्या काळात विधानसभा पार पडणार आहेत. मात्र, त्यापूर्वी भाजपनं झारखंडमधील राष्ट्रवादीचा एकमेव आमदार असलेल्या कमलेश सिंह यांना फोडलं आहे. सिंह येत्या 3 ऑक्टोबरला औपचारिक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात असून, विधानसभेच्या तोंडावर अजितदादांना हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
अजित पवार गटासह भाजपचे अनेक लोक संपर्कात, रोहित पवारांचा मोठा दावा
पहिला धक्का : सीट शेअरिंग
आगामी काळात महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभांसाठी जागा वाटपाची चर्चा सुरू झाली असून, भाजप जागा वाटपात अजितदादांना झटका देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केल्याचे बोलले जात आहे.
या फॉर्म्युल्यानुसार अजित पवार यांच्या पक्षाला 55-60 जागा, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पक्षाला 80-85 जागा आणि भाजपला 150-160 जागा मिळतील असे सांगितले जात आहे. त्यामुळे जर या फॉर्मुल्यानुसार जागा वाटप झाले तर, राजकीय प्रँकचा पहिला झटका अजितदादांना सीट शेअरिंगमध्ये बसणार आहे.
हल्ली अर्थ समजेनासा झालाय; महात्मा गांधींचा उल्लेख करत राज ठाकरेंची वाचाळवीरांना फटकार
आमदारांची संख्या अधिक तरीही कमी महत्त्व
सध्याच्या घडीला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे 38 आमदार आहेत, तर अजित पवार यांच्या पक्षाकडे राष्ट्रवादीचे 40 आणि काँग्रेसचे 2 आमदार आहेत. असे असतानाही अजित पवार यांना जागावाटपात कमी महत्त्व दिले जात असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, निश्चित झालेला जागावाटपाचा हा फॉर्म्युला अजितला धक्का मानला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दुसरा धक्का : फडणवीसांचे वक्तव्य
लोकसभा निवडणुकीच्या निकालापासून अजित पवार भाजप आणि संबंधित संघटनांच्या रडारवर आहेत. लोकसभेत महाराष्ट्रातील पराभवासाठी भाजपचे स्थानिक नेते सातत्याने अजित यांच्यावर आरोप करत होते. मात्र, आजवर अजित पवार स्थानिक नेत्यांची वक्तव्ये गांभीर्याने घेत नव्हते, परंतु, आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अजित पवारांची मते आमच्याकडे हस्तांतरित झाली नाहीत म्हणून आम्ही लोकसभेत हरलो, असे खापर फडणवीसांनी नुकतेच एका मुलाखतीत बोलताना फोडत आमच्या मतदारांना अजितदादांना सोबत घेणे रूचले नसल्याचे म्हटले होते. फडणवीसांचे हे विधान विधानसभेच्या तोंडवर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही; ‘भाजपचं सरकार स्वबळावर’ म्हणणाऱ्या शहांना दादांचं उत्तर
तिसरा धक्का : झारखंडमधील एकमेव आमदार फोडला
महाराष्ट्राबरोबरच झारखंडमध्येही विधानसभा निवडणुका होणार आहेत. येथे अजित पवार यांच्या पक्षाचा एक आमदार होता. अजितदादा याच आमदाराच्या मदतीने झारखंडमध्ये पक्षाचे अस्तित्व वाढवण्याच्या तयारीत होते. परंतु, ऐन विधानसभेच्या तोंडावरचं भाजपने राष्ट्रवादीचे आमदार कमलेशकुमार सिंह यांना आपल्या गोटात घेतले आहे.
हुसैनाबादमधील राष्ट्रवादीचे आमदार कमलेश सिंह यांनी अमित शहा आणि हिमंता बिस्वा सरमा यांची भेट घेतल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने अजित पवार यांच्या पक्षाला झारखंड एनडीएकडून जागा मिळण्याची शक्यता नाही. अशा स्थितीत महाराष्ट्राबाहेरील पक्षाच्या विस्तारालाही हा धक्का मानला जात आहे.
रोहितदादांच्या कर्जतमध्ये “हम पांच” पण, तुतारीच गायब; राजकीय गुगलीची चर्चा तर होणारच!
भाजपच्या राजकीय प्रँक मागची कारणं काय?
राज्यात आणि परराज्यात भाजपकडून विधानसभेच्या तोंडावर धक्कातंत्राचा वापर केला जात आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे अजितदादांचे दबावाचे राजकारण कमी करणे हेच मानले जात आहे. कारण एनडीएमध्ये सामील झाल्यानंतरही अजितदादा सातस्याने मुख्यमंत्रिपदाची मागणी करत आहेत. अनेकदा अजितदादांनी सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याशिवाय अजितदादांच्या मागणीपुढे भाजप झुकत नसल्याचा संदेश भाजप आपल्या समर्थकांना देण्याचा प्रयत्न करत आहे.