Uday Samant reaction on NCP Political Crisis : राष्ट्रवादीत बंड करून अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यानंतर मंत्रिमंडळाची बैठकही झाली आहे. अजित पवार गटाच्या कोणाला काय खाते मिळणार याची उत्सुकता आहे. अजित पवार यांनी घडवलेल्या या भूकंपावर अजूनही प्रतिक्रिया येतच आहेत.
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी या घडामोडींवर सावध प्रतिक्रिया दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीला जाण्याच्या आधी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सामंत म्हणाले, एकनाथ शिंदे सर्वांना बरोबर घेऊन जाणारे सर्वसमावेशक नेतृत्व आहे. एकनाश शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात हे राज्य अधिक वेगाने विकास करील याचा विश्वास आहे.
अजितदादांची हाक अन् तनपुरेंची ‘देवगिरी’वर धाव; दादांनंतर मामांनाही भेटणार
दोन परिपक्व राजकारण्यांत तिसऱ्या परिपक्व राजकारण्यामुळे महायुती झाली आहे. आता हे तीन्ही नेते समन्वयाने काम करतील. एकमेकावर वॉच ठेवण्याचा काहीच प्रश्न येणार नाही. शिंदेंच्या नेतृत्वात फार मोठी कामे राज्यात आगामी काळात होतील.
राष्ट्रवादी आल्याने तुमच्या वाट्याची अर्धी भाकरी कमी होणार आहे का, असा प्रश्न पत्रकारांनी सामंत यांना विचारला. त्यावर सामंत म्हणाले, तुम्ही भाकरीच्या फंदात पडू नका. भाकरीच्या सगळ्या गोष्टी या तिकडं होत्या आमच्याकडं नव्हत्या. त्यामुळे शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आमच्या भाकऱ्या तशाच तव्यावर आहेत त्यामुळे तु्म्ही त्याची काळजी करू नका. ज्यांना परतवायची होती ती अजितदादांनी कशी परतवायची हे दाखवून दिलं आहे.
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली याची पूर्वकल्पना तुम्हाला होती का या प्रश्नावर सामंत म्हणाले, शिंदेंना विश्वासात घेऊनच भाजपने हा निर्णय घेतला आहे. आता शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महायुती झाली आहे.
पवारांच्या निर्णयला उशीर झाला अन् एकनाथ शिंदेंनी बाजी मारली; पटेलांनी फोडला बॉम्ब