पवारांच्या निर्णयला उशीर झाला अन् एकनाथ शिंदेंनी बाजी मारली; पटेलांनी फोडला बॉम्ब

पवारांच्या निर्णयला उशीर झाला अन् एकनाथ शिंदेंनी बाजी मारली; पटेलांनी फोडला बॉम्ब

NCP Political Crisis : गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड करून भाजपसोबत सत्तास्थापन केली. त्यावेळी त्यांनी आमदारांना सुरत मार्गे गुवाहाटीला घेऊन जात बंड पुकारलं होत. त्याचवेळी राष्ट्रवादीच्या अजित पवार आणि प्रफुल्ल पटेलांनी देखील भाजपसोबत जाण्याचा प्लॅन केला होता. त्यासंदर्भात त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना पत्र देखील लिहिले होते. मात्र त्यांनी लवकर निर्णय घेतला नाही. तेपर्यंत शिंदेंनी परत येत मुख्यमंत्री पदाची शपथ देखील घेतली. असा खळबळजनक गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष आणि मंत्री प्रफुल्ल पटेलांनी केला आहे. ( NCP would with BJP instead of Eknath Shinde Prafull Patel Expose during NCP Political Crisis )

सुप्रिया सुळेंमुळे अजितदादा बाहेर? पृथ्वीराज चव्हाणांनी थेट सांगितले

प्रफुल्ल पटेलांनी नुकत्याच एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी सांगितलं की, जेव्हा गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड केलं होतं. त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार कोसळणार होतं. त्याचवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना पत्र लिहिण्यात आलं होत. त्यामध्ये राष्ट्रवादीने भाजपसोबत सरकार स्थापन करावं अशी मागणी करण्यात आली होती. त्याला राष्ट्रवादीच्या 54 पैकी तब्बल 51 आमदारांचा पाठिंबा होता. असं देखील पटेल म्हणाले आहेत.

भीषण अपघात! मुंबई-आग्रा महामार्गावर ब्रेक फेल झाल्याने विचित्र अपघात, 10 मृत्युमुखी

पुढे पटेल असं देखील म्हणाले की, शरद पवारांनी आमदारांच्या भाजपसोबत जाण्याच्या पत्रावर निर्णय घ्यायाला उशीर केला त्यामुळे शिंदेंना भाजपसोबत सत्तास्थापनेची संधी मिळाली आहे. मात्र राष्ट्रवादीची भाजपसोबत सत्तास्थापनेची प्रक्रिया 2022 मध्येच सुरू झाली होती. कारण ही मागणी केवळ आमदार खासदारांचीच नव्हती तर कार्यकर्त्यांची देखील मागणी होती. लोकप्रतिनिधींना विकास कामांसाठी निधी मिळत नव्हता. भाजपसोबत सत्तेत गेल्याने हा निधी मिळण्यास मदत होईल आणि विकास कामांना गती मिळेल. तर राज्याच्या प्रगतीसाठी विकासासाठी आम्ही भाजपसोबत आलो आहोत असं देखील यावेळी पटेल म्हणाले आहे.

दरम्यान अजित पवारांच्या बंडानंतर काल (दि. 3) शरद पवारांनी कराड येथे जाऊन प्रितीसंगमावर जात माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला भेट अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी आपण महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचे सांगत येत्या दोन ते तीन महिन्यात राज्यातील चित्र पालटलेले असेल असे सांगितले. त्यानंतर दुपारी राज्याचे नवे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत आमच्याकडे आमदारांचा पाठिंबा असल्याचा पुनुरूच्चार करत त्यांना कारवाई करण्याचा कोणताही अधिकार नसल्याचा खुलासा केला असून, त्यानंतर आता काँग्रेस आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या नेत्यांमध्ये बैठकीचे सत्र सुरू झाले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube