Download App

जयंत पाटीलही आक्रमक मोडमध्ये, काढली अजितदादांची लाज

  • Written By: Last Updated:

Jayant Patil criticized Ajit Pawar : आपल्या वृद्ध बापाच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या त्याच्या कष्टामुळे पडल्या आहेत. याची थोडी फार लाज वाटू द्या, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या अजित पवार (Ajit Pawar) यांना लगावला.  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वातील गटाची आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये सभा झाली. त्यावेळी जयंतरावांनी अजित पवार यांच्या गटाला टोले लगावले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापना दिनी झालेल्या जाहीर सभेत अजित पवार यांनी प्रदेशाध्यक्षपदाची मागणी आपल्या भाषणात केली होती. त्याची खिल्ली जयंतरावांनी उडविली.  अशा गोष्टी जाहीर सभेत बोलायच्या नसतात हे देखील यांना माहीत नाही आणि चाललेत राज्याचा कारभार हाकायला. माझ्या कानात जरी म्हटले असते तरी मी प्रदेश अध्यक्ष पदावर पाणी सोडले असते, अशा शब्दांत त्यांनी सुनावले.

अजितदादांसोबत गेलेल्या छगन भुजबळ यांनाही जयंत पाटील यांनी सोडले नाही. राज्यात 2019 साली महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं तेव्हा छगन भुजबळांना पवारांनी कशी संधी दिली हे त्यांनी आवर्जुन सांगितले. शिवतीर्थावर मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी जेव्हा उद्धव ठाकरेंनी दोन नावे विचारली तेव्हा शरद पवारांनी पहिलं नाव छगन भुजबळांचं सांगितलं असल्याचंही जयंत पाटील यांनी सांगितलं.

महाविकास आघाडीला रिक्षा म्हणून चिडवत होते. आता स्वतः काय विमानात बसले कि काय असा टोला पाटलांनी भाजपला लगावला. साहेब बांधतील ते तोरण आणि म्हणतील ते धोरण असे म्हणत जयंत पाटील यांनी अमोल कोल्हेंना पक्षाच्या प्रचार प्रमुखाची जबादारी दिली.

वय झालं तरी थांबायला तयार नाहीत; अजित पवारांचा शरद पवारांवर हल्लाबोल

‘त्यांनी’ माझ्या कानात सांगितलं असतं तरी.. 

जयंत पाटील पुढे म्हणाले, मला शरद पवारांनी बोलावून सांगितलं होतं की 6 तारखेला बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत सर्वांशी चर्चा करून काही महत्वाचे बदल करावे लागतील. त्यावेळी मी त्यांना म्हणालो होतो की मला काहीच अडचण नाही. पण अशा गोष्टी जाहीर सभेत बोलायच्या नसतात. काही जणांनी आता हा नवा प्रघात पाडला आहे. त्यांनी (अजित पवार) माझ्या कानात जरी सांगितलं असतं तरीही मी तत्काळ सांगून टाकलं असतं की आता बस झालं मला पद नको दुसऱ्या कुणाला तरी संधी द्या.

Tags

follow us