Download App

Irshalwadi Landslide : इर्शाळवाडी दुर्घटनेची थरारक कहाणी अजित पवारांनी सभागृहात सांगितली

Ajit Pawar on Irshalgad Landslide : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी गावानं काल मुसळधार पावसाचं रौद्ररुप पाहिलं. हा पाऊस आला तो मोठं सकट घेऊनच. मुसळधार पावसात मोठी दरड कोसळली अन् अख्खे गावच या दरडीखाली दबले गेले. आता या ठिकाणी मदतकार्य युद्ध पातळीवर सुरू असून आतापर्यंत 98 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे. आता या घटनेबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळात सविस्तर माहिती दिली आहे.
ते म्हणाले, बुधवारी रात्री १०.३०  ते ११ या दरम्यान ही दुर्घटना घडली. इरसालवाडी हे चौक मानिवली ग्राम पंचायतमधील डोंगर दरीत वसलेली छोटीशी वाडी आहे. या ठिकाणी वाहने जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही. गावातून पायी चालत जावे लागते. सदर वस्ती तीव्र उतारावर असल्याने दैनंदिन दळवळण प्रमुख रस्त्याने जोडलेले नाही. दूरध्वनी किंवा मोबाइलने संपर्क साधणेही कठीण आहे. हे ठिकाण भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार संभाव्य दरडप्रवण ठिकाणाच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेले नाही. याआधी येथे दरड कोसळणे, भुस्खलन होणे अशा प्रकरच्या घटना घडलेल्या नाहीत.

Irshalgad Landslide : इर्शाळवाडी घटनेने जागवल्या माळीण अन् तळीयेच्या भयावह आठवणी

 

या गावात ४८ कुटुंब (२२८ लोकसंख्या) वास्तव्यात होती. त्यापैकी २५ ते २८ कुटुंब बाधित झालेली आहेत. २२८ पैकी ७० नागरिक स्वत: घटनेच्या वेळीच  सुरक्षित असल्याचे प्राथमिक माहिती आहे. सकाळी १०.१५ वाजताच्या अहवालानुसार १० लोकांच्या मृत्यू झालेला आहे. उर्वरीत लोकांचा शोध व बचावकार्य सुरू आहे.
पुण्याहून रात्रीच NDRF २ टिम  (६० जवान)  निघून पहाटे ४ पूर्वी पोहोचले आहेत. तसेच sniffer dog  squad  सुद्धा घटनास्थळी पोहोचले आहेत. घटनास्थळ हे अतिदुर्गम भागात असल्याने कोणत्याही वाहनाने घटनास्थळी पोहचणे अशक्य असल्याने डोंगर पायथ्याशी तात्पुरते नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आलेला आहे. व तेथील संपर्क क्र. 8108195554 आहे.
पनवेल येथील ट्रेकर्स ग्रुप यशवंती ट्रेकर्स व निसर्ग गुप नियमित ट्रेक करणारे व त्या परीसरातील भैागोलिक परीस्थिताचे अनुभव असणारे तरुण बचाव पथकात सहभागी झालेले आहेत.  हवाईदलाची दोन हेलिकॉप्टर पहाटेपासून सांताक्रुझ हवाईतळावर बचावासाठी तयार आहेत मात्र, खराब हवामानामुळे उड्डान घेऊ शकत नाही. स्थानिक प्रशासनाने पायथ्याशी तात्पुरते हेलिपॅड तयार केले असून वातावरण अनुकूल होण्याची वाट पाहत आहेत.

Raigad Landslide : क्षणात होत्याचं नव्हतं झालं.. इर्शाळवाडीवर कोसळला दुःखाचा डोंगर

 

Tags

follow us