Irshalgad Landslide : इर्शाळवाडी घटनेने जागवल्या माळीण अन् तळीयेच्या भयावह आठवणी
Irshalwadi Landslide : इर्शाळवाडीने जाग्या केल्या माळीण-तळीयेच्या दरड कोसळल्याच्या भयावह घटनांच्या आठवणी कुणाचे आई-वडिल गेले, कुणाचा भाऊ गेला, तर कुणाचा ऐन म्हतारपणात आधारच गेला. ही भयान परिस्थिती ओढावलीय रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळवाडीमधील गावकऱ्यांवर. गाव झोपेत असतानाच काळाने अख्या गावावर घाला घातलाय. इर्शाळवाडीवर बुधवारी रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास दरड कोसळली. अन् अनेक कुटुंब मातीच्या ढीगाऱ्याखाली दबली गेली. या घटनेने पुण्यातील माळीण आणि रायगडमधील तळीये या गावांमध्ये घडलेल्या अंगावर काटा आणणाऱ्या दरड कोसळल्याच्या घटनांची पुनरावृत्ती झालीय. ( Memories of Pune Malin and Raigad Taliye Landslide Raigad Khalapur Irshalwadi Landslide )
Manipur : “कोणत्याही दोषींना सोडलं जाणार नाही!” सुप्रीम कोर्टाने फटकारताच PM मोदींचा इशारा
माळीण आणि तळीयेमध्ये नेमकं काय घडलं होतं हे जाणून घेऊया…
2014 ला माळीण पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात डिंभे धरणाच्या परिसरात माळीण हे एक आदिवासी भागातील गाव . 750 च्या आसपास लोकसंख्या असलेल्य या गावावर 30 जुलै 2014 रोजी पहाटेच्या वेळी डोंगराचा कडा कोसळला अन् 44 हून अधिक घरं, पुरुष, महिला, लहान मुले, पाळीव प्राणी जनावरे मातीच्या ढीगाऱ्याखाली दबली गेली. सहा दिवस ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढण्याचं काम दिवस-रात्र सुरु होतं. तब्बल 151 मृतदेह बाहेर काढले तेव्हा अनेकांवर अंत्यसंस्कार करायला कुटुंबातील कोणीही जिवंत राहिलेलं नव्हतं.
Manipur : मन हेलावणारी घटना! सुप्रीम कोर्ट संतापले; तात्काळ कारवाईचे मोदी सरकराला निर्देश
त्यानंतर 2021 ला रायगड जिल्ह्यातीलच महाड तालुक्यातील तळीये या गांवातही या घटनेची पुनरावृत्ती झाली. माळीण प्रमाणे तिथेही अगदी तेच घडलं 22 जुलै 2021 रोजी दुपारी साडेचार वाजता दरड कोसळली, गावातील 35 घरं जमीनदोस्त झाली, जे कामावर गेले होते तेच जिवंत राहिले, उरलेले सर्व दरडीखाली दबले गेले. ढिगाऱ्यातून 53 मृतदेह बाहेर काढण्यात आले. चार दिवशी बचावकार्य केल्यावरून बेपत्ता 31 जणांना मृत घोषित करण्यात आलं.
त्यानंतर आता पुन्हा इर्शाळवाडीने राज्यात तिसऱ्यांदा अख्ख गावं दरडीखाली गाडलं गेल्याचा घटना घडलीय या तिनही घटनांमध्ये पावसाळा, जुलै महिना आणि रात्रीची वेळ साम्य असणाऱ्या आहेत. त्यात तळीये आणि इर्शाळवाडी दोन्हीही गावं कोकणातीलच. घटना घडतात, सराकर बचावकार्य, मदत आणि गावाचं पुनर्वसनही करत पण अशा घटना वारंवार होऊ नये. राज्यात असो वा देशात असे माळीण, तळीये आणि इर्शाळवाडी पुन्हा निर्माण होऊ नयेत त्यासाठी उपाययोजना करणं गरजेच असल्याचं पुन्हा एकादा अधोरेखित झालंय.