Download App

आयटी पार्क गगनाला भिडणार; FSI बाबत शिंदे सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra State New Information Technology Policy : राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. नवे माहिती तंत्रज्ञान धोरण राबविण्यात येणार आहे. या नव्या माहिती तंत्रज्ञान धोरणात 95 हजार कोटींची नवीन गुंतवणूक आकर्षित करण्याचे उद्दीष्ट सरकारने ठेवले आहे. यातून साडेतीन लाख एवढया रोजगाराची संधी निर्माण होणार आहे. तसेच 10 लाख कोटी एवढ्या निर्यातीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

वेदांता-फॉक्सकॉनला ग्रहण; मोदी-अग्रवाल संबंधात मिठाचा खडा, गुजरातमध्ये मोठा धक्का मिळणार?

हे नवे आयटी धोरण निश्चित करण्यासाठी मागील काही वर्षांत 32 बैठका, 2 चर्चासत्र व 5 सादरीकरण झाले आहे. त्याचप्रमाणे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध भागधारकांशी वेळोवेळी चर्चा करण्यात आली. झालेली चर्चा तसेच या पूर्वीची माहिती तंत्रज्ञान धोरणे राबवितांना विभागाला आलेल्या अनुभवाच्या आधारे राज्याचे नवीन माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा-2023 चा आराखडा तयार करण्यात आला आहे.

हातकणंगलेत राजू शेट्टींची कोंडी; राष्ट्रवादीतून स्वतः जयंत पाटीलच उतरणार लोकसभेच्या मैदानात?

या धोरणा अंतर्गत पुण्यासह पिंपरी- चिंचवड, मुंबई आणि अन्य महत्त्वाच्या शहरांमध्ये आयटी कंपन्यांसाठी आता पाच चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) मिळणार आहे. 12 ते 27 मीटर रुंदीच्या रस्त्यांनुसार तीन ते पाच एफएसआय देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, कंपन्यांजवळ निवासी वसाहती उभ्या राहाव्या, याला चालना देण्यात आली आहे. त्यात आयटी उद्योगासाठी एकूण जागेपैकी 60 टक्के जागा कंपन्यांसाठी तर उर्वरित 40 टक्के जागा ही व्यावसायिक; तसेच निवासी प्रयोजनासाठी वापरता येणार आहे.

तयारीला लागा! अजित पवारांनी संभाव्य उमेदवारांना दिली हिंट

या अगोदर सरकारने 2015 च्या धोरणानुसार पुणे, पिंपरी-चिंचवड, बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, मीरा-भाईंदर, उल्हासनगर आणि अंबरनाथ महापालिकांत आयटीच्या उद्योगांसाठी एक एफएसआय देऊ केला होता. आता पुण्यासह पिंपरी चिंचवड, मुंबईसाठी पाच एफएसआय देण्यात येणार आहे. त्यात 12 मीटर रस्ता असणाऱ्या उद्योगांसाठी तीन, 18 मीटर रस्त्यासाठी चार तर 27 मीटर रस्त्यासाठी पाचपर्यंत एफएसआय देण्यात येणार आहे. या शिवाय राज्याच्या अन्य भागात 3, 3.5 आणि चारपर्यंत एफएसआय देण्यात येईल.

चौंडीतील वादावरून अजित पवारांचे कानावर हात; म्हणाले रोहितनं…

राज्यात आतापर्यंत 564 नवीन खासगी माहिती तंत्रज्ञान उद्योगांना इरादापत्र देण्यात आले आहे. त्यापैकी 217 उद्योगांच्या नोंदणीचे काम पूर्ण झाले आहे. त्याद्वारे एक कोटी 71 लाख 10 हजार चौरस मीटर इतके बांधकामाचे क्षेत्र तयार झाले आहे. उर्वरित 347 प्रकल्प विकसनाच्या विविध टप्प्यावर असून, त्यातील काही प्रकल्प पुण्या-मुंबईत येणार आहेत. अशी माहिती उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली आहे.

या धोरणा अंतर्गत तेलंगणामध्ये तयार करण्यात आलेल्या ‘टी-हब’ च्या धर्तीवर कळंबोली येथे उद्योग विभागाच्या सहा एकर जागेत ‘एम- हब’ सेंटर उभारण्यात येणार आहे. त्या ठिकाणी ‘स्टार्टअप्स’साठीचे सेंटर असणार आहे. तेथे उद्योगांसाठी प्रशिक्षण केंद्र असेल. दोनशे प्रशिक्षणार्थीची निवासाची व्यवस्था असणार आहे. नवीन तंत्रज्ञानाचा उगम, भांडवल, कौशल्य आणि गुणवत्ता या आधारे नवीन उद्योगांचा विकास तसेच व्यवसाय करण्यासाठीच्या नव्या पद्धतींना प्रोत्साहन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता राज्यात पुण्या-मुंबईसह आयटी कंपन्या वाढणार असून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत.

Tags

follow us