Maharashtra Weather Update yellow alert by IMD : राज्यामध्ये एकीकडे तापमान वाढीमुळे नागरिक आहेत. तर दुसरीकडे अवकाळीच संकट ( Maharashtra Weather Update ) देखील कायम आहे. राज्यातील काही भागांमध्ये आजही अवकाळी पावसाची शक्यता आहे. गेल्या पाच दिवसात राज्यभरात अवकाळी पावसाने थैमान घातल्यानंतर आज देखील हवामान विभागाने ( IMD ) येलो अलर्ट ( yellow alert ) जारी केला आहे.
Horoscope Today: आज ‘कन्या’ राशीला मिळणार चांगली बातमी! मोठा धनलाभ होण्याची शक्यता
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज राज्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागामध्ये तुरळ ठिकाणी पावसाच्या सरी पाहायला मिळतील. त्यामध्ये पुढील 24 तासात बीड, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर या भागात पाऊस होण्याची शक्यता आहे, तसेच पुढील दोन दिवसासाठी विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र या भागांसाठी जारी करण्यात आला आहे.
कन्हैया कुमार देणार मनोज तिवारी यांना टक्कर, काँग्रेसकडून 13 वी यादी जाहीर
विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस 30-40 किमी प्रतितास वेगाे येण्याची शक्यता आहे. pic.twitter.com/KCMOXipPLp
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) April 14, 2024
यामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये विदर्भातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे. या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उस्मानाबाद, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांना देखील येलो अलर्ट जारी करण्यात आला असून या ठिकाणी 16 आणि 17 एप्रिलला पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे मात्र राज्याची राजधानी मुंबईमध्ये हवामान कोरडे राहणार असून तापमान वाढीचा इशारा देण्यात आला आहे.
या अवकाळी पावसाचा फटका पिकांना बसला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आताही पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. वीज पुरवठाही वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अवकाळी पावसाने केलेल्या या नुकसानीची तत्काळ माहिती घ्यावी. पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना सरकारने भरीव मदत करावी अशी मागणी आता होत आहे.