कन्हैया कुमार देणार मनोज तिवारी यांना टक्कर, काँग्रेसकडून 13 वी यादी जाहीर

कन्हैया कुमार देणार मनोज तिवारी यांना टक्कर, काँग्रेसकडून 13 वी यादी जाहीर

Lok Sabha Election Congress Candidates List : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) काँग्रेसने (Congress) 10 नावांची 13 वी यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने मोठा निर्णय घेत ईशान्य दिल्लीतून मनोज तिवारी ( Manoj Tiwari) यांच्या विरोधात कन्हैया कुमारला (Kanhaiya Kumar) उमेदवारी दिली आहे .

काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये जेपी अग्रवाल यांना दिल्लीच्या चांदनी चौक, कन्हैया कुमार यांना ईशान्य दिल्ली, उदित राज यांना उत्तर पश्चिम दिल्लीतून तिकीट देण्यात आले आहे. याशिवाय काँग्रेसने पंजाबमधील 6 जागांसाठी देखील उमेदवारांची घोषणा केली आहे. काँग्रेसने अमृतसरमधून गुरजीत सिंग औजला, जालंधरमधून माजी मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी, फतेहगढ साहिबमधून अमर सिंग, भटिंडामधून जीत मोहिंदर सिंग सिद्धू, संगरूरमधून सुखपाल सिंग खैरा आणि पटियालामधून डॉ. धरमवीर गांधी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. याशिवाय उत्तर प्रदेशच्या अलाहाबाद जागेवर उज्ज्वल रेवती रमण सिंह यांना संधी देण्यात आली आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत सीपीआयच्या तिकिटावरून बेगुसरायमधून निवडणूक (Begusarai seat) लढवणारे कन्हैया कुमारला यावेळी काँग्रेसकडून ईशान्य दिल्लीतून संधी देण्यात आली आहे. बेगुसरायची जागा डाव्या पक्षांकडे असल्याने त्यांना काँग्रेस दिल्लीमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याची चर्चा होती. आज त्यांच्या नावाची घोषणा झाल्याने आता मनोज तिवारी विरुद्ध कन्हैया कुमार अशी लढत ईशान्य दिल्लीमध्ये होईल.

कन्हैया कुमार दिल्लीच्या राजकारणात एक चर्चित चेहरा असल्याने ईशान्य दिल्ली मतदारसंघात ते विद्यमान खासदार मनोज तिवारी यांना टक्कर देऊ शकतात असं बोललं जात आहे.

कन्हैयाला राहुल गांधींचा पाठिंबा

मनोज तिवारी यांच्या विरोधात ईशान्य दिल्ली मतदारसंघातून दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अरविंदर सिंग लवली यांना उमेदवारी जाहीर करण्यात येणार होती मात्र काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कन्हैया कुमार यांच्या नावाला पाठिंबा दिल्याने या जागेवर कन्हैया कुमार यांचा नाव फिक्स झाल्याची माहिती समोर आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज