राहुल गांधी, केसी वेणुगोपाल आणि कन्हैया कुमार यांच्याविरोधात एफआयआर

राहुल गांधी, केसी वेणुगोपाल आणि कन्हैया कुमार यांच्याविरोधात एफआयआर

Bharat Jodo Nyaya Yatra : काँग्रेसची आसाममधून ‘भारत जोडो न्याय यात्रा’ (Bharat Jodo Nyaya Yatra) सुरु आहे. या यात्रेदरम्यान गोंधळ झाल्याने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात आसाम पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. खुद्द मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले, काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज हिंसाचार, चिथावणी देणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे आणि पोलिसांवर हल्ला केला. या प्रकरणी राहुल गांधी (Rahul Gandhi), केसी वेणुगोपाल, कन्हैया कुमार आणि इतर लोकांविरुद्ध दाखल करण्यात आला आहे.

याआधी आज राहुल गांधींच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला गुवाहाटीत प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले होते. यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन करत बॅरिकेड्स तोडले. यानंतर हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, डीजीपींना गुन्हा नोंदवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सरमा यांनी गुन्हा नोंदविण्याच्या सूचना दिल्या
मी आसाम पोलिस महासंचालकांना राहुल गांधी यांच्यावर जमावाला भडकावल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सांगितले.

आशुतोष काळेंनी अमेरिकेतून सही कशी केली? शरद पवार गटाने ठेवलं बोट

ते म्हणाले, ही (हिंसा) आसामच्या संस्कृतीचा भाग नाही. आसाम शांतताप्रिय राज्य आहे. असे नक्षलवादी डावपेच आमच्या संस्कृतीच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. तुमच्या बेजबाबदार वृत्तीमुळे आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यामुळे गुवाहाटीच्या रस्त्यांवर ट्रॅफिक झाली होता.

लोकसभेसाठी आता सहकारी सोसायट्यांमध्येही मतदान केंद्र, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

राहुल गांधींनी उत्तर दिले
त्याचवेळी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी या प्रकरणी पत्रकार परिषदेत सांगितले की, आसामचे मुख्यमंत्री जे काही करत आहेत, त्याचा फायदा यात्रेला होत आहे. जी प्रसिद्धी आम्हाला मिळत नाही, ती आम्हाला मिळत आहे. यामध्ये आसामचे मुख्यमंत्री, मंत्री आणि कदाचित त्यांचे गृहमंत्री अमित शहा आम्हाला मदत करत आहेत.

Oscar 2024: ‘ओपेनहायमर’ पासून ‘बार्बी’ पर्यंत… ‘या’ चित्रपटांना ऑस्करसाठी नामांकन

follow us
  • fb
  • instagram
  • youtube