लोकसभेसाठी आता सहकारी सोसायट्यांमध्येही मतदान केंद्र, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

लोकसभेसाठी आता सहकारी सोसायट्यांमध्येही मतदान केंद्र, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Voting Center in housing society : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) शहरातील सहकारी संस्थांमध्येही मतदान केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. शहरी मतदारांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या गृहनिर्माण सोसायटीमध्ये (Housing society) मतदान केंद्र बांधले जाणार आहे, त्या सोसायटीतील रहिवाशांना तसेच त्या सोसायटीबाहेरील नागरिकांना मतदानासाठी तेथे जावे लागणार आहे.

या शहरांतील सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र
भारत निवडणूक आयोगाने मुंबई, पुणे, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड या अतिशहरीकरण असलेल्या जिल्ह्यांमध्ये अशी मतदान केंद्रे निर्माण करण्याचे निर्देश दिले आहेत. यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातील 36 गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्र तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लोकसभा निवडणूक 16 एप्रिलला? व्हायरल पत्राचं खरं इलेक्शन कमिशनने सांगितलं

या आधीच्या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या मतदान केंद्रांवरच मतदान होऊ शकत होते. मात्र, निवडणूक आयोगाच्या या ताज्या निर्णयानंतर शहरातील गृहनिर्माण सहकारी संस्थांमध्येही मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.

शहरी मतदारांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी घेतलेल्या या निर्णयाला काही ठिकाणी मतदार आणि राजकीय पक्षांकडून आक्षेप घेतला जाण्याची शक्यता आहे.

Maratha Reservation : तब्बल 200 प्रश्न अन् 40 पानांचा अर्ज; ‘सर्वेक्षणा’च्या अर्जात नेमकं काय?

लोकसभेच्या निवडणुका 16 एप्रिलला नाहीत
निवडणूक आयोगाचे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये लोकसभा निवडणुकीची तारीख 16 एप्रिल असल्याचे म्हटले आहे. आता केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे. निवडणूक आयोगाने ही तारीख केवळ निवडणुकीच्या कामाचा संदर्भ म्हणून नोंदवली असल्याचे सांगितले. त्यामुळे आता 16 एप्रिलला निवडणूक होणार असल्याच्या चर्चा थांबल्या आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube