Download App

बस पेटवणारे, जाळपोळ करणारे कोण होते? मनोज जरांगे पाटलांनी सांगितली हकीकत

जालना : आंतरवाली सराटी गावात सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान, हिंसा करणारे, जाळपोळ करणारे आणि बस पेटवणारे हे मराठा समाजातील नाहीतच असं म्हणत या मागे कोणीतरी मठ्यांच्या आंदोलनाला संपवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी केला आहे. मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या हिंसक निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यमांशी बोलताना हा आरोप केला. (Manoj Jarange alleges that efforts are underway to end the Maratha reservation movement)

आंतरवाली सराटी गावातील लाठीचार्जनंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी निदर्शन झाली. यात काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्यानंतर 19 बसची तोडफोड करणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे या आरोपाखाली अनेकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. याबाबत विचारले असता जरांगे पाटील यांनी शांततेने, कायद्याच्या प्रमाणात आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन केले.

Jalna Maratha Andolan : जालन्याचे एसपी तुषार दोषी सक्तीच्या रजेवर, सरकारकडून पोलिसांवर कारवाई सुरू

जरांगे पाटील पुढे म्हणाले, मी जाहीरपणाने सांगतो आम्ही काल खोलात जाऊन माहिती घेतली, यात जाळपोळ करणारे, धिंगाणा घालणारे आमचे लोकच नाहीत. ते मराठा समाजाचे लोकच नाहीत. कोणीतरी मराठ्यांच्या आंदोलनाला गालबोट लागावं, म्हणून ते या गोष्टी करत आहेत, असा आरोप केला. गरिबांचा आंदोलन सामान्यचं आंदोलन हे चिरडू नका, आम्हाला बदनाम करु नका असंही ते म्हणाले. तसंच आमच आंदोलन शांततेत सुरुच राहणार आहे, तुम्ही गोळ्या घातल्या तरी आणि बॉम्बे टाकला तरी आम्ही शांततेत आंदोलन करणार. मात्र आरक्षण घेणार, असा निर्धाही त्यांनी व्यक्त केला.

Road Accident : भीषण अपघात! उड्डाणपुलावरून खाली पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू

जिल्हा पोलीस अधिक्षकांना सक्तीच्या रजेवर :

आंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला शुक्रवारी सायंकाळी हिंसक वळण लागल्याने पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांचे नाव चर्चेत आहे. आता त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. गृह विभागाने ही कारवाई केली आहे. आंतरवली सराटी येथे घडलेल्या हिंसाचारात अनेक आंदोलक जमखी झाले. या आंदोलनाने उग्र रुप धारण केल्यानं विरोधकांनी सरकारवर टीका केली. यानंतर गृहमंत्रालयाने या संपूर्ण घटनेची दखल घेतली घेत अधिक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.

Tags

follow us