Download App

ओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत, आमच्यात भांडणं लावून सरकार…; जरांगेंचा गंभीर आरोप

मनोज जरांगे पाटील यांनी हाके यांच्या उपोषणावर टीकास्त्र डागलं. ओबीसी आंदोलनं हे सरकार पुरस्कृत असल्याची टीका जरांगेंनी केली.

  • Written By: Last Updated:

Manoj Jarange Patil on OBC reservation :  मराठा आरक्षणाविरोधात (Maratha reservation) ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी उपोषण छेडले आहे. ओबीसी आरक्षणाच्या (OBC reservation) संरक्षणार्थ त्यांनी उपोषण सुरू केलं असून आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे. दरम्यान, आता मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी हाके यांच्या उपोषणावर टीकास्त्र डागलं. राज्यात सुरू असलेली ओबीसी आंदोलनं हे सरकार पुरस्कृत असल्याची टीका जरांगेंनी केली.

Antarpat मालिके पार पडणार गौतमी-क्षितिजचा विवाहसोहळा; पाहा खास फोटो 

मनोज जरागेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, आम्ही जसं आंदोलन करत आहोत, तसाच ओबीसींना देखील आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आम्ही कोणाला रोखणार नाही, कोणाला रोखू शकत नाही. त्यांनी त्यांचे आंदोलन करावं. आम्ही आमचे आंदोलन सुरूच ठेवू आणि आमच्या मागण्या मांडू. पण, राज्यात सुरू असलेले ओबीसी आंदोलनं ही सरकार पुस्कृत आहेत. याआधीचे आंदोलन आणि आताचे आंदोलन पाहिले की, हे लक्ष्यात येते, अशी टीका जरांगेंनी केली. आंदोलनात एवढी गर्दी कशी? सरकार हे मुद्दाम घडवून आणत असल्याचंही जरांगे म्हणाले.

अरविंद केजरीवालांना न्यायालयाचा दणका, 3 जुलैपर्यंत वाढला ‘तिहार’मधील मुक्काम 

मराठा-ओबीसींत सरकार भांडणं लावतंय….
ओबीसी आंदोलन सुरू झाल्यापासून सरकार कोंडीत सापडल्याची चर्चा आहे. यावर बोलताना जरांगे म्हणाले, हे सरकार कोणत्याही कोंडीत सापडलेलं नाही, तर त्यांनीच हे आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे ते कोंडीत अडकले आहेत असे म्हणता येणार नाही. ही फक्त सरकारी नाटके आहेत. हे सरकार आम्हाला वेडे समजत आहे. सरकार आमच्या आमच्यात भांडणं लावून एका बाजूला स्वस्थ बसून पाहतयं. मुळात गावात ओबीसी आणि मराठा बांधव एकच आहेत. मात्र सरकार त्यांच्यात भांडण लावून गप्प बसलं.

निंबाळकरांवर साधला निशाणा
मराठा आरक्षणाचा प्रश्न केंद्र सरकारच सोडवू शकते, असे विधान धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी केलं होतं. त्यावरून जरांगे संतप्त झाले. ते म्हणाले की, कदाचित ओम राजेनिंबाळकर यांना काही माहीत नसेल. मराठ्यांना ओबीसींमधून (कुणबी जात प्रमाणपत्रासह) आरक्षणाची मागणी केली आहे. याचा अर्थ आम्हाला 50 टक्क्यांच्या आत आरक्षण हवे आहे आणि आम्ही या मागणीवर ठाम आहोत. त्यामुळे कोणीही विनाकारण मुसळ घालू नये. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत बोलायचे असेल तर नीट बोला, अन्यथा बोलूच नका, असं जरांगे म्हणाले.

follow us

वेब स्टोरीज