Antarpat मालिकेत पार पडणार गौतमी-क्षितिजचा विवाहसोहळा; पाहा खास फोटो

कलर्स मराठी वाहिनीवरील नुकतीच प्रदर्शित झालेली नवी मालिका 'अंतरपाट' ही चांगलीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून रसिकवर्ग नव्या मालिकेला भरभरून प्रेम देत आहेत.

सध्या या मालिकेत रश्मी अनपट आणि अशोक धगे म्हणजेच आपले गौतमी आणि क्षितिजचे लवकरच लग्न पार पडणार असून प्रेक्षकांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागून राहिली आहे.

गौतमी आणि क्षितिज यांच्या लग्नाचा हा अद्वितीय महासप्ताह कलर्स मराठीवर आपल्याला दिसणार असून त्याची सुरुवात देखील झाली आहे.

ट्रेंडिंगच्या नावाखाली केले जाणारे विविध प्रकार, या सगळ्या गर्दीमध्ये महाराष्ट्राची परंपरा आणि सांस्कृतिक वैभव जपणारे सुंदर असे लग्न म्हणजे कलर्स मराठीवरील 'अंतरपाट' या मालिकेमधल्या क्षितीज आणि गौतमीचे लग्न.

या सगळ्यात ऐकायला येतील मराठी लोककलेची लोकगीते जी प्रत्यक्षात लोककलाकार सादर करतील. म्हणजे केवळ बघण्यातच नाही तर ऐकण्यात सुद्धा पारंपारिक वैभव झळकत आहे.
