Download App

नाद खुळा! जरांगेंच्या दसरा मेळाव्यासाठी 900 एकराचं मैदान, 500 क्विंटल बुंदी, अन्…

मनोज जरांगे पाटील यांचा नारायण गडावरपहिला दसरा मेळावा होत आहे. पोलिसांकडून एकूण 900 एकर क्षेत्रावर या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलंय.

  • Written By: Last Updated:

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न प्रलंबित असताना मनोज जरांगे पाटी (Manoj Jarange Patil) यांचा बीडमधील नारायण गडावर (Narayan Gad) पहिला दसरा मेळावा होत आहे. पोलिसांकडून परवानगी मिळाल्यानंतर आता मराठा समाजाकडून या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. नारायण गडाच्या एकूण 900 एकर क्षेत्रावर या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलंय.

राजधानी दिल्लीत पोलिसांची मोठी कारवाई, 2 हजार कोटींचे कोकेन जप्त 

पोलिसांनी जरांगेंच्या मेळाव्याला परवानगी देत तब्बल 16 अटी घातल्या. मेळाव्यात प्रक्षोभक भाषण तसेच समाजात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य करणार नसल्याची देखील अट पोलिसांनी घातली.

कोल्हेंनी अण्णाभाऊंच्या पुतळ्याचं अनावरण हाणून पाडलं; मातंग समाजाचा आरोप, निषेध केला व्यक्त 

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील आग्रही आहेत. मात्र, अद्याप आरक्षण मिळालं नाही. आता विधानसभा निवडणुकीपूर्वी हा मेळावा होत असल्याने त्याचं महत्व वाढलं. या मेळाव्यातून जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरून सरकारवर जोरदार हल्ला चढवण्याची शक्यता आहे. जरांगे पाटील पहिल्या दसरा मेळाव्यात नेमकं काय बोलणार, ते आपली राजकीय निर्णय घेणार का? याकडंही सर्वाचं लक्ष लागलंत.

900 एकरावर होणार मेळावा…
दरम्यान, हा दसरा मेळावा यशस्वी करण्यासाठी मराठा समाजाने जोरदार कंबर कसली आहे. या मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. विशेष म्हणजे जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा नारायण गडावरील 900 एकरावर घेतला जाणार आहे. त्यासाठी सुमारे 200 एकर जागेवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय 10 वैद्यकीय कक्षही उभारण्यात आलेत.

100 रुग्णवाहिका तैनात अन् 500 क्विंटल बुंदीचा महाप्रसाद…
याचवेळी 100 हून अधिक रुग्णवाहिका या मेळाव्यात तैनात करण्यात येणार आहेत. या मेळाव्यासाठी नारायणगडावर 500 क्विंटल बुंदीचा महाप्रसाद होणार आहे. जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

जरांगे पाटील यांच्या मेळाव्यासाठी आयोजकांकडून रात्रंदिवस मेहनत घेतली जातेय. मेळाव्यानंतर महाप्रसाद असल्याने परिसरात टँकर आणि बाटल्यांमधून पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आरक्षण देण्यात अडथळे निर्माण करत असल्याची टीकाही जरांगेंनी केली. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी अद्याप पूर्ण झाली नसल्याने जरांगेंच्या भूमिकेकडे सर्वांच लक्ष लागलयं.

follow us