राजधानी दिल्लीत पोलिसांची मोठी कारवाई, 2 हजार कोटींचे कोकेन जप्त
Drugs worth Rs 2000 crores seized again in Delhi : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यात आता राजधानी दिल्लीत (Delhi News) पोलिसांनी (Delhi Police) मोठी कारवाई केली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दिल्लीतून 2 हजार कोटी रुपयांचे कोकेन (Cocaine) जप्त केले आहे. रमेश नगर भागातील एका गोदामातून पोलिसांनी सुमारे 200 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने रमेश नगर भागातील एका गोदामातून ते जप्त केलेय. दिल्ली पोलिसांनी आठवडाभरात मिळवलेले हे दुसरे मोठे यश आहे.
कोल्हेंनी अण्णाभाऊंच्या पुतळ्याचं अनावरण हाणून पाडलं; मातंग समाजाचा आरोप, निषेध केला व्यक्त
मिळालेल्या माहितीनुसार, या महिन्याच्या सुरुवातीला, दिल्ली पोलिसांनी आंतरराष्ट्रीय ड्रग सिंडिकेटचा पर्दाफाश केला आणि ऑक्टोबरच्या सुरुवातीला राष्ट्रीय राजधानीच्या महिपालपूरमध्ये 602 किलोपेक्षा जास्त कोकेन जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या मालाची किंमत 6,500 कोटी रुपये असल्याचं पोलिसांना सांगितलं. दरम्यान, याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने या सिंडिकेटशी संबंधित सातव्या आरोपीला अटक केली आहे. अखलाख असे आरोपीचे नाव असून तो हापूर (उत्तर प्रदेशचा) रहिवासी आहे.
अखलाखची चौकशी केल्यानंतर स्पेशल सेलने आज दिल्लीतील रमेश नगरमध्ये छापा टाकून 200 किलो कोकेन जप्त केले.
मोठी बातमी! आमदार तानाजी मुटकुळेंची प्रकृती खालावली, एअर अॅम्बुलन्सने मुंबईला हलवलं
प्रमोद सिंग कुशवाह अतिरिक्त पोलीस विशेष कक्षाचे आयुक्त यांनी सांगिलते की, अलीकडच्या काळातील हा सर्वात मोठा कोकेनचा साठा आहे. या कोकेनसह पोलिसांनी तुषार गोयल (40), हिमांशू कुमार (27) आणि औरंगजेब सिद्दीकी (23, रा. दिल्ली) आणि भारत कुमार जैन (48) रा. मुंबई यांना अटक केल्याचं कुशवाह यांनी सांगितलं.
या प्रकरणातील तुषार गोयल हा या सिंडिकेटचा सूत्रधार असल्याचे पोलिसांनी सांगितले. हे सिंडिकेट दिल्ली आणि इतर मेट्रो शहरांमध्ये कॉन्सर्ट आणि रेव्ह पार्ट्यांमध्ये सिंडिकेट मोठ्या प्रमाणात ड्रग्जची विक्री करत असल्याचीही माहिती समोर आली.
महिपालपूरमध्ये कोकेन सापड्याने खळबळ
यापूर्वी 2 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी दक्षिण दिल्लीतील महिपालपूर भागातील एका गोदामातून 560 किलो पेक्षा जास्त कोकेन आणि 40 किलो ‘हायड्रोपोनिक गांजा’ जप्त केला होता. यामध्ये सहभागी असलेल्या आरोपींपैकी एक युवक काँग्रेसचा माजी सदस्य आहे. त्यावरून राजकारण सुरू झाले असून, भाजप काँग्रेसवर टीका करत आहे. तर त्या व्यक्तीची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.