Download App

Manoj Jarange Patil : जरांगे पाटील सोमवारी नगर शहरात, असे असेल महारॅलीचे नियोजन

Manoj Jarange Patil  : मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा आरक्षण शांतता रॅलीसाठी सोमवारी

  • Written By: Last Updated:

Manoj Jarange Patil  : मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा आरक्षण शांतता रॅलीसाठी सोमवारी (12 ऑगस्ट) रोजी ऐतिहासिक अहमदनगर (Ahmednagar) शहरात येणार आहे. माळीवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून त्यांच्या पायी रॅलीला सुरुवात होणार आहे.

जरांगे पाटील यांची ही रॅली माळीवाडा परिसरातून सुरु होणार असून चितळे राेडमार्गे जाणार आहे. तर चाैपाटी कारंजा येथे जरांगे यांची तोफ धडकणार आहे.

या रॅलीसाठी जिल्हा मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी तयारी देखील सुरु केली आहे. तसेच रॅली मार्ग भगवामय करण्यात येणार आहे. मराठा आरक्षण शांतता रॅलीसाठी संपूर्ण जिल्ह्यातून मराठा बांधव येणार आहे अशी देखील माहिती जिल्हा मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी दिली आहे.

रॅलीत होणारी गर्दी पाहता शहर व परिसरातील शाळा व महाविद्यालयांना सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जरांगे पाटील यांची रविवारी पुणे शहरात शांतता रॅली काढणार आहे. तर 12 ऑगस्ट रोजी अहमदनगर शहरात शांतता रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. सोमवारी केडगाव येथे जरांगे पाटलांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर माळीवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून या रॅलीला सुरुवात होणार आहे. सध्या संपूर्ण जिल्ह्यात या रॅलीबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

सोमवारी  जिल्ह्यातील मराठा बांधव मोटरसायकल, ट्रॅक्टरने नगर शहरात येणार असल्याने त्यांच्या वाहनांच्या पार्किंगची देखील व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी दिली आहे. दौंड रस्त्यावरील नेमाने इस्टेट येथे पुणे रस्त्याने येणाऱ्यांसाठी तर मार्केटयार्ड येथे कर्जत जामखेडवरून येणाऱ्यांसाठी आणि पाथर्डी, शेवगाव, नेवासे, राहाता, राहुरी, श्रीरामपूर आदी ठिकाणावरून येणाऱ्यांसाठी कल्याण रस्त्यावरील फटाका मार्केट, गाडगीळ पटांगण, न्यू आर्ट्स काॅलेज मैदानावर पार्किंगची व्यवस्था जिल्हा मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी केली आहे.

राज ठाकरेंकडून अपरिपक्व वक्तव्य, फ्रस्ट्रेशनमधून आरोप, सुषमा अंधारेंचा प्रत्युत्तर

असा असेल रॅलीचा मार्ग

सोमवारी मनोज जरांगे यांचे केडगाव येथे आगमन होणार आहे. त्यानंतर माळीवाडा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा येथून पायी रॅलीला सुरुवात होणार. मार्केट यार्ड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून ही रॅली  माळीवाडा, पंचपीर चावडी, कापड बाजार, चितळे रोड, चौपाटी कारंजा येथे जाणार आहे. चौपाटी कारंजा येथे रॅलीचा समारोप होणार आहे.

follow us