IAS Pooja Khedkar : मावळमध्ये शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवून दमदाटी केल्याच्या प्रकरणात मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) तुरुंगात आहेत. मनोरमा या वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या (Pooja Khedkar) आई आहेत. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन (Pune Police) पसार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या मनोरमा खेडकरला पोलिसांनी थेट महाडमधून अटक केली होती. यानंतर न्यायालयाने त्यांची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे. या कोठडीत असताना त्यांनी तक्रारींचा पाढा सुरुच ठेवला आहे. आताही त्यांनी तुरुंगात मिळत असलेलं जेवण बेचव असल्याची तक्रार केली आहे. पोलिसांनी मात्र या तक्रारीत काहीच तथ्य नसल्याचे स्पष्ट करत त्यांची तक्रार फेटाळली आहे.
पूजा खेडकरांच्या अडचणीत आणखी वाढ; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगही करणार तपास
शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) मनोरमा खेडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्या फरार होत्या. महाडमधील एका हॉटेलमधून पोलिसांनी त्यांना अटक केली. शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर शेतकऱ्याला धमकावतानाचा व्हिडिओ व्हायरल होत होता. अटकेनंतर न्यायालयाने त्यांची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे.
पोलिसांना सदर व्हिडीओतील पिस्तूल शोधायचे आहे आणि अंगरक्षकांना ताब्यात घ्यायचे असल्याने पोलिसांनी या प्रकरणात पोलीस कोठडी मागितली होती त्यानुसार न्यायालयाने मनोरमा खेडकर यांना पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडीत असताना त्यांच्या तक्रारी मात्र सुरुच आहेत. आता येथे मिळणारं जेवण बेचव असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. पोलिसांनी मात्र या तक्रारीत काहीच तथ्य नसल्याचं म्हटलं आहे.
पूजा खेडकर यांच्या वडिलांना, ‘त्या’ प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
राष्ट्रीय मागासवर्ग आयोग पूजा खेडकर यांनी OBC प्रवर्गाचा गैरवापर केलाय हे तपासणार आहे. तसेच आयोगातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाकडे पूजा खेडकरांसदर्भात काही तक्रारी आल्या होत्या. आयोगानं याबाबत वैयक्तिक प्रशिक्षण विभागाकडे (डीओपीटी) विचारणा केली. आयोगाकडून आता लवकरच एक ड्राईव्ह सुरू केला जाणार आहे. पूजा खेडकर प्रकरणानंतर देशभरातून आयोगाकडे आलेल्या तक्रारींची दखल घेणार असल्याचे सांगण्यात आले.
तळवडे येथील खेडकर कुटुंबियांशी संबंधित कंपनीला पिंपरी चिंचवड महापालिकेने (Pune News) सील केले आहे. या कंपनीने महापालिकेचा मालमत्ता कर थकवला म्हणून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. या कंपनी संचालकाकडे महापालिकेचा दोन लाख 77 हजार रुपयांचा कर थकीत आहे. यामुळे महापालिकेच्या कर संकलन आणि कर आकारणी विभागाने कंपनीला सील ठोकले आहे.