Download App

मराठा समाजात ‘प्री-वेडिंग फोटोशूट’वर बंदी; वधू-वर मेळाव्यात मराठा सेवा संघाचा ठराव

Marath Seva Sangh againt Pre-wedding shooting : गेल्या काही वर्षांमध्ये वधू-वरांचं लग्नाअगोदर प्री वेडिंग फोटोशूट करण्याचा ट्रेंड सुरू झाला. त्यानंतर एखाद्या परंपरेप्रमाणे प्रत्येक लग्नामध्ये अगदी आवर्जून हे प्री वेडिंग फोटोशूट केलं जात. त्यामध्ये वेगवेगळ्या लोकेशनवर जाऊन हे फोटोशूट केलं जात. फोटोग्राफर त्यांची टीम आडमाप खर्च असं सगळं या प्री वेडिंग फोटोशूटसाठी केलं जातं.

Wrestlers Protest : आमच्यावर सात तासांत एफआयआर अन् बृजभूषणविरोधात मात्र… सुटकेनंतर बजरंग पुनिया पुन्हा आक्रमक

मात्र यामुळे अनेकदा लग्नामध्ये या प्री वेडिंग फोटोशूटमुळे मोठ्या अडचणी आल्याच्या घटना घडल्याचं देखील पाहायाला मिळत आहे. यापार्श्वभूमीवर आता मराठा सेवा संघाने एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. मराठा सेवा संघाने थेट मराठा समाजातील वधू-वरांनी प्री वेडिंग फोटोशूट करू नये असा ठरावच मांडला आहे.

Road Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोन जणांचा होरपळून जागीच मृत्यू

सोलापूरमध्ये रविवारी शिवस्मारक सभागृहात मराठा सेवा संघाच्या वतीने वधू-वर मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी हा ठराव मांडण्यात आला. त्याला सर्व समाज बांधवांनी एकमताने मान्यता दिली. याबाबत जिल्हाधिकारी आणि शासनाला जिजाऊ ब्रिगेड आणि संभाजी ब्रिग्रेडच्या वतीने निवेदन देण्यात आले. त्यामुळे समाज बांधवांनी या ठरावाची पायमल्ली न करता प्री वेडिंगला पायबंद घालावा.

साक्षी मलिक, संगीता आणि विनेश फोगटची सुटका, बजरंग पुनिया अजूनही कोठडीत

त्याचबरोबर यावेळी विवाह जमवताना होणारी दलालीला आळा बसला पाहिजे. समाजातील विवाहाची परिस्थिती भयानक आहे. आई-वडिलांनी व्यापक आपेक्षा ठेवल्याने अनेक चांगल्या मुला-मुलींचे विवाह होत नसल्याचं चित्र निर्माण झालं आहे. त्यामुळे पालकांनी व्यापक अपेक्षा न करता कर्तृत्ववान आणि सुसंस्कार मुलगा-मुलगी पाहून विवाह करावेत असं देखाल यावेळी मेळाव्यातील मान्यवरांनी आपल्या भाषणातून सांगितले आहे.

Tags

follow us