Maratha Reservation : उपोषण सोडायला तयार पण सोडवायला कोणी येतच नसून आरक्षणाचा जसा खेळखंडोब मांडल्याचा प्रकार दिसत असल्याची खोचक टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केली आहे. जरांगे यांचं उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यावं, अशी अट जरांगे यांनी घातल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे येणार असल्याचं बोललं जातं होतं, मात्र, मुख्यमंत्री न आल्याने मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.
मनोज जरांगे म्हणाले, आम्ही उपोषण सोडायला तयार, पण ते सोडवायला कुणी येतच नाहीत, आरक्षणाचा जसा खेळखंडोबा मांडलाय त्यातलाच हा प्रकार. एखादा मित्र दुसऱ्या मित्राला जसं म्हणतो की ये… नुसतं ये म्हणतो. तसं हे म्हणतात की आरक्षणासाठी एक महिन्याचा वेळ द्या. पण ती वेळ नेमकी कशासाठी पाहिजे हे मात्र सांगत, नसल्याचंही मनोज जरांगे म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मला भेटालया येणार आहेत, याबद्दलच्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर मला समजलं की ते येणार आहेत. त्यामुळे मला असं कोणीही अधिकृतपणे सांगितलं नव्हतं, पण मी अशा बातम्या ऐकत असल्याचंही ते म्हणाले आहेत. तसेच मला जास्त राजकारण कळत नाही, इतकी फेकाफेकी मी बघितली नाही. राजकारणात गोम असते… हे लोक शेंगा हाणत आहेत.. तरीही मुख्यमंत्री येतील असा मला विश्वास असल्याचं मनोज जरांगे म्हणाले आहेत.
‘मराठा सहजासहजी पेटत नाही अन् पेटला तर विझत नाही’; जरांगेंची लेक कडाडली
मनोज जरांगे यांनी राज्य सरकारसमोर काही अटी ठेवल्या आहेत. त्यानूसार निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या समितीचा अहवाल काहीही येवो, आरक्षण द्यावेच लागेल. राज्यात मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावे लागतील, लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना निलंबित करा, तसेच उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, संभाजीराजे छत्रपती, उदयनराजे आले पाहिजेत, अशा प्रमुख अटी जरांगे पाटलांनी राज्य सरकारसमोर ठेवल्या.
पाकिस्तानात राजकीय हालचालींना वेग; माजी पंतप्रधान नवाज शरीफ ‘या’ तारखेला परतणार
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले :
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याशी फोनवर चर्चा सुरु असून शिष्टमंडळ आजही जरांगे पाटलांशी चर्चा करणार आहेत, त्यानंतरच पुढील निर्णय घेणार असल्याचं मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जरांगे पाटील यांची भेट घेण्यास जाणार नाही हे निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जालना दौरा रद्द झाला आहे. मुख्यमंत्री शिंदे हे नीलम गोऱ्हे यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला राजभवनात उपस्थित आहेत. मुख्यमंत्र्याच्या भेटीनंतर मनोज जरांगे आमरण उपोषण मागे घेणार होते, त्यामुळेच या भेटीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते.