Maratha Reservation : माझ्या वडिलांना काही झालं तर मराठा समाज सोबत घेऊन राज्यकर्यांच्या घरात घुसून मारणार असल्याची धमकी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे(Manoj Jarange) यांची कन्या पल्लवी जरांगे (Pallavi Jarange) हिने दिली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील आठ दिवसांपासून मनोज जरांगे यांचं उपोषण सुरु आहे. उपोषणाच्या 4 ते 5 दिवसांनंतर मनोज जरांगे यांनी समाजाचा मान राखत पाण्याचा घोट घेतला होता. मात्र, पुन्हा त्यांनी पाणी न घेण्याचा निर्णय घेतला. आमरण उपोषणामुळे मनोज जरांगे यांची प्रकृती चिंताजनक होत चालली असल्याने पल्लवी जरांगे हिने राज्यकर्त्यांनी थेट धमकीच दिली आहे.
मराठा आरक्षणासंदर्भातील सर्वपक्षीय बैठकीवर संभाजीराजे छत्रपतींचा बहिष्कार; ट्वीट करत सडकून टीका
पल्लवी जरांगे पाटील म्हणाल्या, मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत 49 जणांचा बळी गेला आहे. मग काय माझ्या वडिलांचा जीव गेल्यावर आरक्षण देणार आहात का? माझ्या वडिलांना काही झाले तर या सरकारला जागेवर ठेवणार नाही. अख्खा मराठा समाज सोबत घेऊन राज्यकर्त्यांच्या घरात शिरुन त्यांना मारीन. एवढी हिंमत माझ्यात त्यांची मुलगी म्हणून असल्याचं पल्लवी जरांगे म्हणाल्या.
दिल्ली आणि मुंबईत वर्ल्डकप सामन्यांदरम्यान आतिशबाजी नाही, बीसीसीआयचा निर्णय
तसेच मराठा आणि कुणबीसंदर्भातील पुरावे मराठवाड्यात उपलब्ध असून राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीचं काय काम आहे? सरकारने 30 दिवस मागितले होते. माझ्या वडिलांनी सरकारला 40 दिवस दिले आहेत, पण या दिवसांत सरकारने काय केलं, पुन्हा कशाला मुदत हवी आहे, काहीही कारणए देऊ नका, सरळ सरळ आरक्षण देण्याची मागणी पल्लवी जरांगे यांनी केली आहे.
Nilesh Lanke : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमदार लंकेंचे मंत्रालयाबाहेर उपोषण
उग्र आंदोलन, आत्महत्या करु नका :
राज्यात मराठा समाज शिस्तबद्ध असून लोकशाही मार्गाने आरक्षण घ्यायचं आहे. कुठेही उग्र आंदोलन आत्महत्या करु नका, पप्पांना मी सांगते तुम्ही आंदोलन करा पण प्रकृतीची काळजी घ्या, मागच्या वेळी सरकारने विश्वासघात केलायं, सरकारने आता सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन विषय संपवावा, असंही पल्लवी जरांगे म्हणाल्या आहेत.
‘सरकारला आपली मागणी मान्य करावीच लागेल’; शाहू महाराज छत्रपतींनी घेतली जरांगेंची भेट
दरम्यान, मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल होत आहेत, त्यावर बोलताना पल्लावी म्हणाली की, मराठ्यांकडून चूक झाली तर त्यांना लगेच दिसते. परंतु सरकारकडून होणाऱ्या चुकांवर पांघरुन टाकले जात आहे. मागील वेळेस पोलिसांकडून लाठीचार्ज केला होता, त्यासंदर्भात अजून काही कारवाई नसल्याचे पल्लवी जरांगेंनी लक्षात आणून दिले आहे.