Manoj Jarange Patil News : मराठ्यांच्या लेकरांसाठी गुन्हे अंगावर घ्या, मीही एसआयटी अंगावर घेतलीयं, पण मागे हटू नका, असं आवाहन मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarnage Patil) मराठा समाजबांधवांना केलं आहे. मराठा आरक्षणासाठी सरकारला घेरण्याची रणनीती मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा बांधवांकडून आखली जात आहे. लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) आज अंतरवली सराटीत महाबैठक पार पडली. या बैठकीत मनोज जरांगे बोलत होते.
“मुलांना सांगतो, राजकारणात यायचं असेल तर शून्यातून उभं राहा”; गडकरींनी स्पष्टच सांगितलं
मनोज जरांगे म्हणाले, आरक्षणासाठी सर्वच संकंटांना सामोरं जावं लागणार आहे. मराठा समाजाने ज्यांना मोठं केलं ते आपल्या लेकरांच्या मुंडक्यावर पाय देत आहेत. सरकारला मराठा समाजाकडून अनेकदा वेळ दिला . सरकारने त्यांचाच डाव साधला अटी शर्ती आम्हाला घातल्या अन् त्याच्याबाहेर जाऊन काम सरकारने केलं आहे. पण सरकारने कितीही डाव टाकले तरीही यशस्वी होऊ द्यायचे नाही, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.
धंगेकरांनी निवडणुकीपूर्वीच जिंकला पहिला डाव… शिंदे-फडणवीस अन् अजितदादांवरही पडले भारी!
मराठ्यांना आंदोलनामुळे आत्तापर्यंत एकूणम 57 लाख कुणबीच्या नोंदी मिळाल्या आहेत. या जुन्या नोंदींमुळे जवळपास सव्वा कोटी मराठ्यांना आरक्षण मिळालं आहे. नोंदीचे अर्ज सरकारने थांबवून धरले आहेत. तालुक्यात तहसील स्तरावर समित्या स्थापन केल्या आहेत. त्यावर त्यांनी किती काम केलं हे कोणालाही माहिती नाही. तहसिलदाराच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केल्या आहेत पण कोणालाही विश्वासात घेतलं जात नसल्याचा आरोपही मनोज जरांगे यांनी यावेळी केला आहे.
मुहूर्त ठरला! फडणवीस, शिंदे अन् अजितदादांचा ग्रीन सिग्नल; 26 मार्चला आढळराव हाती ‘घड्याळ’ बांधणार
मागील काळात मराठा समाजाकडून करण्यात आलेल्या आंदोलनामुळे मराठा समाजबांधवावर सरकारकडून उशिराने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये आंदोलनात वापरण्यात आलेले जेसीबी क्रेन वाहनांच्या मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाहनमालकांना दंड आकारण्यात येत आहे. मराठ्यांवरही गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. सरकारला खोटे गुन्हे दाखल करायचे असेल तर लेकरांसाठी गुन्हे अंगावर घ्या, मीदेखील एसआयटी अंगावर घेतली पण मागे हटू नका, असं आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना केलं आहे.