“मुलांना सांगतो, राजकारणात यायचं असेल तर शून्यातून उभं राहा”; गडकरींनी स्पष्टच सांगितलं

“मुलांना सांगतो, राजकारणात यायचं असेल तर शून्यातून उभं राहा”; गडकरींनी स्पष्टच सांगितलं

Nitin Gadkari : ‘माझ्या मुलांना मी सांगितलं आहे की माझ्या जीवावर राजकारणात यायचं नाही. राजकारणात यायचंच असेल तर भिंतींवर पोस्टर लावावं लागेल. शून्यातून उभं राहावं लागेल. लोकांत जाऊन काम करावं लागेल. कारण माझ्या राजकीय कारकीर्दीवर खरा अधिकार भाजपा कार्यकर्त्यांचा आहे. लोकांनी मला उभं केलंय आणि मी लोकांसाठीच काम करतो’, हे शब्द आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे. नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी खास आपल्या स्टाइलमध्ये घराणेशाहीच्या राजकारणावर हल्ला चढवलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदीही नेहमीच देशातील घराणेशाहीच्या राजकारणाला टार्गेट करत असतात. आता गडकरींनीही या राजकारणाचा आपल्यालाही किती तिटकारा आहे, हेच सांगितले.

भाजपला 200 पेक्षा कमी जागा मिळतील, पुढील PM नितीन गडकरी; आंबेडकरांचा मोठा दावा

गडकरी म्हणाले, मी आधीच सांगितलं होतं की जो मत देणार त्यांचं काम करणार आणि जे लोक मत देणार नाहीत त्यांचेही काम करणार. ज्यांनी देशात आणीबाणी लादली ते आज आमच्यावर आरोप करत आहेत. लोकांना समजावून सांगू शकत नाही त्यावेळी असे गोंधळाचे वातावरण निर्माण करण्याचे काम विरोधकांकडून केले जाते.

गडकरी पुढे म्हणाले, लाखो कार्यकर्त्यांनी बलिदान केलं तेव्हा आज हा दिवस पहायला मिळत आहे. अरुणाचल प्रदेशात नागपूरच्या नागरिकांकडून टॅक्सीवाले पैसे घेत नाहीत. याचं कारण ते देतात की हा रस्ता नितीन गडकरींना बनवला आहे. लोकसभा अध्यक्षांनी एकदा मला फोन करून बोलावून घेतलं. तेव्हा विरोधी पक्षातील 75 खासदारांनी माझी प्रशंसा केली. यामध्ये राहुल गांधी, सोनिया गांधी, असदु्द्दीन ओवैसी यांचा समावेश होता. मी त्यांच्याही मतदारसंघात कामे केली.

Lok sabha Election : नितीन गडकरींविरोधात विकास ठाकरे, काँग्रेसची दुसरी यादी जाहीर

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना गडकरींचा खास सल्ला 

यानंतर गडकरींनी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, मला काँग्रेसचे काही लोकं येऊन भेटले. म्हणाले, आम्ही तुमच्यासाठी काम करतो. मी म्हटलं काम करा पण तुमचं राजकीय आयुष्य खराब करून घेऊ नका. मतदारसंघात पाच लाखांच्या मताधिक्याने मी निवडून येणार याची मला खात्री आहे. बस, टॅक्सी असं मी काहीच देणार नाही. माझा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी किती लोकं येतात हे मला आता पहायचं आहे, असेही गडकरी म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube