भाजपला 200 पेक्षा कमी जागा मिळतील, पुढील PM नितीन गडकरी; आंबेडकरांचा मोठा दावा
Prakash Ambedkar : देशात लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहेत. या निवडणुकीत (Lok Sabha Election) भाजपप्रणित एनडीए आघाडीने 400 पारचा नारा दिला आहे. तर महाराष्ट्रात 45 पेक्षा जास्त जागा निवडून आणण्याचा चंग बांधला आहे. त्यादृष्टीने नवीन मित्र जोडण्यावर भर देण्यात आला आहे. या घडामोडींवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी भाष्य केले आहे. या निवडणुकीत भाजपला किती जागा मिळतील या प्रश्नाचे उत्तरही त्यांनी दिले.
या निवडणुकीत देशभरात (Elections 2024) भाजपला किती जागा मिळतील असा प्रश्न एका खासगी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत त्यांना विचारण्यात आला. त्यावर आंबेडकर म्हणाले, देशात भाजपला 400 चा आकडा पार करता येणार नाही. भाजप फक्त 170 ते 175 जागा जिंकेल असे वाटते. राज्यात किती जागा जिंकेल (Maharashtra Politics) याबाबत मात्र त्यांनी भाष्य टाळले.
भाजपाचे 400 जागांचे उद्दीष्ट साध्य झाले नाही तर नरेंद्र मोदी यांना (PM Narendra Modi) पुन्हा पंतप्रधान होण्याची संधी मिळेल याची शक्यता नाही. एनडीएला 200 पेक्षा कमी जागा मिळाल्या तर नितीन गडकरी यांना (Nitin Gadkari) पंतप्रधान होण्याची संधी राहिल. नितीन गडकरींचे सर्वपक्षीयांशी सलोख्याचे संबंध आहेत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
‘इंडिया’च्या व्यासपीठावर प्रकाश आंबेडकर आले; पण ठाकरे, पवारांसमोरच थेट घराणेशाहीवर बोलले !
मविआत जाण्याबाबत अजूनही आशावादी
महाविकास आघाडीमध्ये जाण्यासाठी मी अजूनही तयार आहे. उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीही आम्ही महाविकास आघाडीमध्ये जाऊ शकतो. त्यासाठी माझ्या काही अटी आहेत. त्या अटी मी मविआच्या नेत्यांबरोबर झालेल्या पहिल्याच बैठकीत बोलवून दाखविल्या आहेत. भाजपविरोधात काय-काय बोलायचे हे ठरविले पाहिजे ही माझी पहिली अट होती. त्यानंतर निवडणुकीचा अजेंडा ठरविणे हे दुसरी अट होती. त्याच मराठा आणि ओबीसी वादही मिटला पाहिजे, या मताची मी होतो. परंतु त्यावर निर्णय झालेला नाही.