मुहूर्त ठरला! फडणवीस, शिंदे अन् अजितदादांचा ग्रीन सिग्नल; 26 मार्चला आढळराव हाती ‘घड्याळ’ बांधणार
पुणे : आगामी लोकसभेसाठी शिरूर मतदारसंघात अजितदादांची ताकद वाढणारे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील (Shivaji Adhalrao Patil) 26 मार्च रोजी राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी दिली आहे. यावेळी अजितदादा, फडणवीस आणि शिंदेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्यास ग्रीन सिग्लन दिल्याचे आढळराव पाटलांनी सांगितले. आढळरावांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे आता शिरूरमध्ये अमोल कोल्हे विरूद्ध आढळराव पाटील अशी थेट लढत होणार हे आता स्पष्ट झाले आहे. (Shivaji Adhalrao Patil Join NCP On 26th March 2024)
Sanjay Raut : राऊतांकडून मोदींना नवी उपाधी; कंस मामा म्हणत फोडलं नव्या वादाला तोंड
तटकरे म्हणाले की, अजितदादांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. त्यानुसार येत्या 26 मार्च रोजी संध्याकाळी शिरूर आंबेगाव परिसरात हा पक्ष प्रवेश होणार असून, प्रचाराचा शुभारंभच त्या दिवशी पाहयला मिळेल असा जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याचे तटकरे म्हणाले. आढळराव पाटलांच्या प्रवेशाने त्यांची शिरूरमधील उमेदवारी निश्चित मानली जात आहे का? असा प्रश्न विचारला असता तटकरे म्हणाले की, सध्या महायुतीत जागा वाटपांची चर्चा सुरू असून आज (दि.23) संध्याकाळपर्यंत जागा वाटपांवर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. ज्या पद्धतीने आढळराव पाटील राष्ट्रवादीमध्ये येत आहेत तसे काही जण दुसऱ्या पक्षात जाऊ शकतात का? यावर तटकरे म्हणाले की, महायुतीने 45 प्लसचा निर्धार केला आहे. काही गोष्टींसाठी वाट बघावी लागते असे सूचक विधान यावेळी तटकरेंनी केले.
वेळ आली तर, शिवसेनेतून बाहेर पडणार पण अजितदादांना नडणारचं; शिवतारे बारामतीसाठी ठाम
आढळराव म्हणाले की, आता मी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याने शिरूरमध्ये कुणाला उमेदवारी मिळणार हे निश्चित झाले असून, 2019 मध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी आपण निवडणुकीच्या मैदानात उतरल्याचे आढळराव पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. माझा विजय होईल याची मलाच काय माझ्या संपूर्ण जनतेला खात्री असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यापूर्वाचा माझा झालेल्या विजय आणि यंदाच्या वर्षी होणारा विजय हा पूर्वेचे सर्व रेकॉर्ड मोडित निघतील. म्हाडाचे असलेले अध्यक्षपद सोडणार का असे विचारले असता, आढळराव म्हणाले की, उमेदवारी आणि निवडणुकांच्या त्या पदाची काहीही संबंध नाही. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी निर्धार केला असून, त्याच मार्गाने सर्वजण विजयासाठी काम करणार असल्याचे आढळरावांनी यावेळी सांगितले.