मी खानदानी मराठा असून गद्दारी माझ्या रक्तात नसल्याचं मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच ठणकावून सांगितलं आहे. मागील 17 दिवसांपासून सुरु असलेल्या आमरण उपोषणस्थळी मुख्यमंत्री शिंदे दाखल झाले, यावेळी मुख्यमंत्र्यांसमोर मनोज जरांगे यांनी उपोषणही सोडलं आहे. मात्र, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या चिठ्ठीमुळे कार्यक्रम झाल्याचं म्हणत मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर संताप व्यक्त केला आहे.
मराठा आरक्षणासाठी सुरु असलेलं आमरण उपोषण आज जरांगे यांनी सोडलं आहे, मात्र, काल बुधवारी रावसाहे दानवे यांनी मनोज जरांगे यांना एक चिठ्ठी दिल्याचं समोर आलं होतं. त्यांनतर दानवेंनी दिलेल्या चिठ्ठीमुळे लोकांनी मला अनेक प्रश्न विचारले, एका संघटनेने माझ्यावर आरोपही केले आहेत, पण मी खानदानी मराठा असून गद्दारी करणं माझ्या रक्तात नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरचं जरांगेंनी स्पष्ट केलं आहे.
Marathi Serial : ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अक्षया नाईकची रंगभूमीवर एन्ट्री; नाटक लवकरच येणार
तसेच जरांगे म्हणाले, दानवेंनी चिठ्ठी दिल्यानंतर काहींनी माझ्यावर आरोप करण्यास सुरुवात केली. पण मी खानदानी मराठा आहे. कुणाच्या सांगण्यावरून उपोषण करत नाही आणि मागेही घेत नाही. लोकांना विचारूनच मी सरकारला एक महिन्याचा अवधी दिला. त्याला तमाम लोक साक्षीदार आहेत,
‘बोलून मोकळं व्हायचं’ म्हणत अडचणीत सापडलेल्या CM शिंदेंसाठी बावनकुळेंची बॅटिंग
दानवे दादांच्या चिठ्ठीने फार अवघड कार्यक्रम झाला. माझा बाप अजूनही कष्ट करतोय आणि मी समाजासाठी लढतोय. माझी राखरांगोळी झाली तरी चालेल, पण मराठा समाजाशी गद्दारी करणार नाही. माझी ती औलाद नाही, माझे ते रक्तही नाही. माझ्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप मी सहन करणार नसल्यचंही ते म्हणाले आहेत.
दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेलं आमरण उपोषण अखेर मनोज जरांगे यांनी सोडलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हाताने ज्यूस पिऊन त्यांनी उपोषण सोडल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी मनोज जरांगे यांचं कौतूक केल्याचं दिसून आलं आहे. समाजाच्या वेदना मला ठाऊक असून माझ्यावर विश्वास ठेवा, त्यानंतर जरांगेंनी आमरण उपोषण मागे घेतलं आहे.