Sangeeta Wankhede On Manoj Jarnage : मराठा आरक्षणावर महिलांनी थेट भाष्य केल्याने सोशल मीडिया ट्रोलिंग, धमक्या, आणि महिलांवरच्या शाब्दिक बलात्कारावर मनोज जरांगे कधी बोलला का? असा सवाल उपस्थित करीत मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या महिला सहकारी संगिता वानखेडे (Sangeeta Wankhede) भडकल्या आहे. दरम्यान, सरकारकडून मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर मनोज जरांगे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले जात आहेत. आधी अजय बारस्कर महाराज आता त्यांच्याच महिला सहकारी संगिता वानखेडे यांनी गंभीर आरोप केले आहेत.
क्रिकेट सोडलं अन् बनले पक्के राजकारणी; ‘या’ खेळाडूंची ‘पॉलिटिक्स’ इनिंगही गाजली
संगिता वानखेडे यांनी मराठा आरक्षणाच्या लढ्यात सहभाग घेतला होता. त्यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांविरोधात रोखठोक भूमिका मांडत जशास तसं उत्तर दिलं होतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी लाईव्ह करीत सडेतोड भाष्यही केलं होत. त्याचवेळी सोशल मीडियावर मला ट्रोलिंग, धमक्या, आणि शाब्दिक बलात्काराला सामोरं जावं लागत होतं, तेव्हा मनोज जरांगेंना अनेकदा फोन करुन सांगितलं पण जरांगे यावर काहीच बोलला नसल्याचा आरोप संगिता वानखेडे यांनी केला आहे.
बारस्कर हा सरकारचा ट्रॅप, तुकाराम महाराजांच्या आडून आंदोलन संपवण्याचा डाव, जरांगेंचा पलटवार
ज्यावेळी ट्रोलिंग धमक्या दिल्या जात होत्या त्यावेळी जरांगेंच्या सहकाऱ्यांना अनेक फोन केले. त्यावेळी आम्ही सांगतो, कळवतो, असं सांगितलं जात होतं. त्याचदरम्यान एकदा फोन सुरु असतानाच मनोज जरांगे म्हणाला, मी त्या बाईला सांगितलं नाही बोल म्हणून मला आरक्षण महत्वाचं आहे ते रिकामे धंदे मला सांगायचे नाहीत. लोकं मोठं होण्यासाठी रिकामे धंदे करत असतात, या शब्दांत मनोज जरांगे यांनी माझी मागणी धुडकावून लावली असल्याचं संगिता वानखेडेंनी सांगितलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज होणे नाही आणि होणारही नाही. स्वत:ला कुणी छत्रपती म्हणून घेऊ नका, छत्रपतींमधल काय आहे मनोज जरांगेंमध्ये, त्यांच्या मावळ्यांचा एकही गुण आहे का? मराठा आंदोलनादरम्यान, महिलांबद्दल असं बोललं जात होतं तेव्हापासून आत्तापर्यंत जरांगेंनी कुठं बाईट दिली का महिलांना कुणी ट्रोल करायचं नाही, हा त्यांचा अहंकार असल्याचं म्हणत संगिता वानखेडेंनी संताप व्यक्त केला आहे.
जरांगे मॅनेज झालेला अन् गर्विष्ठ…
अजय बारस्कर महाराजांच्या मुलाखती पाहा, त्यांच्याकडे पुरावे आहेत आणखी काय हवं मनोज जरांगेचं हे थोतांड आहे. या माणसाच्या तोंडातून कधी कोणत्या कार्यकर्त्यांचं नाव ऐकलं का? याला मोठं व्हायचं आहे म्हणून नाव घेत नाही. भाषणापुरत बोलतो तो फक्त देशात लोकशाही आहे. आरक्षण देणारा जरांगे काय हुकुमशाह आहे काय? वेगळं काही थोतांड मांडू नकोस. गोरगरीबांनना अजूनही कायदे संविधान माहित नाही. त्यामुळे ते बळी पडत असल्याचं संगिता वानखेडे म्हणाल्या आहेत.